औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची होणार जप्त ? जप्तीसाठी पथक दारात तर खुर्ची वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कसरत

Sunil chavhan

औरंगाबाद – फुलंब्री तालुक्यातील एका जमिनीचा मावेजा न मिळाल्याने दिवाणी न्यायालयाने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्चीच जप्त करण्याचा आदेश दिला. यापूर्वी कोर्टाने पाठवलेल्या नोटिशींकडे दुर्लक्ष केल्याची शिक्षा जिल्ह्याधिकाऱ्यांना चांगलीच भोगावी लागणार असे दिसतेय. कारण कोर्टाच्या नोटिशीला उत्तर न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कार्यालयात गुरुवारीच बेलिफ दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने मावेजाची रक्कम दिली नाही … Read more

दुसऱ्यादिवशीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने औरंगाबादकर त्रस्त; खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका दुसऱ्यादिवशीही औरंगाबादकरांना बसला आहे. आजही शुक्रवारी देखील पूर्ण क्षमतेने एसटी बसेस धावत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. अनेकांना इच्छा नसतानाही खासगी वाहनाने अतिरिक्त पैसे मजवून प्रवाश करावा लागत आहे. दुसरीकडे औरंगाबादमधील शहर बससेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शहरवासीयांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. येथील सिडको बसस्थानकात … Read more

अरे बापरे ! राज्यात तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस ? औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – ज्ञानाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळांमध्येही आता बनवेगिरी होत असल्याचे समोर आहे. राज्यातील खासगी शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या फुगवून सांगितल्याचा आरोप नुकत्याच एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर राज्यात तब्बव 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील खासगी शाळांनी राज्य सरकारची या माध्यमातून घोर फसवणूक … Read more

थरारक ! राष्ट्रीय महामार्गावरील बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा; रोख रक्कमेसह कोट्यवधींचे दागिने पळविले

Robbary

जालना – जिल्ह्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना काल सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली. शहागड ( ता.अंबड ) येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असतांना गुरुवारी सायंकाळी पावने पाच वाजेदरम्यान तीन … Read more

भरती परीक्षेचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच ! एका उमेदवाराला आले तब्बल 34 हॉलतिकीट

बीड – आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 हॉलतिकीट आले आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. आता या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची कुठे? असा प्रश्न आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पृथ्वीराज अरुण गोरे (रा. … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संशोधक विद्यार्थी RRC पासून वंचित राहू नये – अभाविप

abvp

औरंगाबाद – मागील वर्षी हजारो विद्यार्थी विद्यापीठाची PhD साठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले असून जवळपास एक वर्ष कालावधीने RRC होत आहे. मात्र सद्या महाराष्ट्रात ST महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस व्यवस्था बंद आहे. RRC साठी महाराष्ट्र भरातून विद्यार्थी येणार आहेत. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे RRC ला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत … Read more

…अन अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

ajintha

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.याचा मोठा फटका प्रवासी आणि पर्यटकांना बसत आहे. आज सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची बस बंद असल्याने मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी बैलगाडीची व्यवस्था केल्याने पर्यटकांना लेणींमध्ये जाण्यासाठी बैलगाडीची सवारी मिळाली. एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण … Read more

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी कंत्राटदाराला हायकोर्टाचा दणका; ब्लॅकलिस्टमध्ये नाव

High court

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांचा निकृष्ट दर्जा न राखल्यामुळे कंत्राटदाराला थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे तसेच त्याला बिलापोटी दिलेली रक्कम पुन्हा वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी तपासणी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचे आणि या समितीने रस्त्यांविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. समितीने ज्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचे अहवालात सांगितले, … Read more

उद्घाटनापुर्वीच बियर शॉपीला महिलांनी ठोकले टाळे

Bear

औरंगाबाद – सोसायटीतील नागरिकांचा विरोध झुगारून सुरू होणाऱ्या कासलीवाल तारांगण फाट्यावरील करण बिअर शॉपी ला उद्घाटनापूर्वी संतप्त महिलांनी टाळे ठोकले. महिलांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर छावणी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले. पडेगाव-मिटमिटा परिसरातील कासलीवाल तारांगण हाऊसिंग सोसायटीच्या रस्त्यालगत भास्कर वास्तू येथील व्यावसायिक … Read more

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची वाहतूक विस्कळित; कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणामुळे शहर बसही ठप्प

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. या उपोषणात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहर बसही … Read more