बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – पालकमंत्री सुभाष देसाई

desai

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली. गंगापूर तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून देसाई यांनी शेतकऱ्यांना … Read more

दोन दशकानंतर शहरात रेल्वे समस्यांवर होणार विचारमंथन

Train

औरंगाबाद – अंदाजे दोन दशकांनंतर औरंगाबाद शहरात मराठवाड्यासह मनमाड, अकोला, मध्य प्रदेशातील काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमन ची बैठक घेतल्यानंतर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री … Read more

प्रत्येक प्रभागात एक वार्ड असेल महिलांसाठी राखीव

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपा मध्ये आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा क्षेत्रात 37 प्रभाग तीन वॉर्डांचे तर एक प्रभाग 4 बोर्डाचा होणार आहे. एकूण 38 प्रभागातील एक वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद महापालिकेची मुदत 29 एप्रिल 2020 रोजी संपली … Read more

मराठवाड्यासाठी पॅकेज जाहीर करा; केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांची राज्याकडे मागणी

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. ग्रामीण भागात रस्ते खचले, पूल वाहून गेले. पाझर तलाव फुटले आहेत. औरंगाबद जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करत, हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी (ता.६) पत्रकार … Read more

अतिवृष्टीनंतर 10 दिवसांनी पालकमंत्र्यांना मिळाला आपल्या ‘उद्योगातून’ वेळ

subhash desai

औरंगाबाद – शहरासह औरंगाबाद जिल्ह्याला एका महिन्यात तब्बल तीन वेळा अतिवृष्टीने झोडपून काढले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत, अनेकांच्या शेती पाण्याखाली गेल्या आहेत तर काहींच्या घरावरचे छत उडाले आहे. अशा नैसर्गिक संकटातून औरंगाबाद जिल्ह्यातील जनता जात असताना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना मात्र आपल्या ‘उद्योगातून’ वेळ … Read more

औरंगाबादेत पुन्हा पावसाने दाणादाण ! न्यायालयाच्या आवारात वाहनांवर कोसळले झाड

court

औरंगाबाद – शहरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मागील एका महिन्यापासून औरंगाबादकरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आज ही जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. यावेळी सेशन कोर्टात उभ्या असलेल्या कार वार्‍यामुळे झाड कोसळले, सुदैवाने कार मधील वकील थोडक्यात बचावले आहेत. मात्र, … Read more

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मनसेने घातले अधिकाऱ्यांचे ‘पित्र’

mns

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खड्ड्यांतून वाट काढत वाहन चालवताना चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जळगाव रोडवरील सबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे बोथट संवेदनांचे पित्र पूजन आंदोलन केले. स्मार्ट … Read more

‘स्वर्ग रथालाही’ थांबावे लागले देवळाई रेल्वे फाटकावर !

Crime Body

औरंगाबाद – काल अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एका ‘स्वर्ग रथाला’ शिवाजीनगर रेल्वे फाटकावर फाटक बंद असल्याने दुतर्फा गर्दी मध्ये अडकावे लागले. यामुळे सातारा देवळाई करांच्या नशिबी आलेली अवहेलना मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे दिसून आले आहे. शिवाजीनगर रेल्वे फाटकावर भुयारी रस्ता की पूल होणार याविषयी चा संभ्रम अद्यापही कायम आहे. परंतु, दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना रोज अडचणींना तोंड द्यावे … Read more

औरंगाबादेत पुन्हा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; नागरिकांची तारांबळ

Heavy Rain

औरंगाबाद – शहर आणि ग्रामीण परिसरात बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पावसाला पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागातच पाऊस मुसळधार पाऊस झाला. मात्र आता पुन्हा एकदा विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच … Read more

महावितरणच्या कंत्राटी अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

Lach

औरंगाबाद – नादुरुस्त असलेले विद्युत रोहित्र दुरूस्त करण्यासाठी शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई काल दुपारच्या सुमारास शिल्लेगाव येथे करण्यात आली बाळू धोत्रे (32, सहाय्यक अभियंता लासुर स्टेशन) असे अटकेतील अभियंत्याचे नाव आहे. एका मल्टीसर्व्हिस एजन्सीमार्फत धोत्रे या महावितरण कंपनीच्या लासुर स्टेशन कार्यालयांतर्गत काम करत … Read more