पिस्टूलचा धाक दाखवत पेट्रोलपंपावर भर दिवसा दरोडा; लाखो रुपये लुटून दरोडेखोर पसार

Robbery

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या माळीवाडा येथे भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला आहे. पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवत मोटरसायकलवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. यामुळे परिसरासह व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरात कायद्याचा धाक संपला का ? … Read more

मागण्या सोडविण्यासाठी प्रहारचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील टाकळी येथे कोलते येथे विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी तब्बल सात तास शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यातील काही मागण्या वकरच मंजूर करण्यात येतील असे आश्‍वासन तहसील प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. याविषयी अधिक माहिती अशी की, … Read more

विमानतळासमोरील उड्डाणपुल रद्द; शहरात होणार एकच अखंड उड्डाणपुल – खासदार जलील

औरंगाबाद : शहरात विमानतळ समोरील उड्डाणपूल आता होणार नाही. तसेच जालना रोडवरील तीनही पूल एकमेकांना जोडून अखंड पूल तयार करण्यात येईल, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य झाला असल्याचे देखील जलील यावेळी म्हणाले. दरम्यान, शहरात जालना रोडवर सध्या ३ छोटे उड्डाणपूल आहेत. त्यांना … Read more

औरंगाबाद: तीस कोरोना रुग्णांची नव्याने भर, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद – कोरोना संसर्ग शहरात सध्या थोड्या प्रमाणात असला तरी, ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात शहरात फक्त सात नवीन रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागात 23 रुग्ण वाढले दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 25 जणांना (मनपा7 ग्रामीण 18) सुट्टी देण्यात आली. आज पर्यंत 1 लाख 43 हजार … Read more

सुशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात

Fraud

औरंगाबाद – पोस्टात नोकरी लावण्याच्या आमिषाने तीन सुशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बाजारसावंगी येथील आरोपीला खुलताबाद पोलिसांनी नेरळमधून अटक केली. रवी अबलुकराव नलावडे (रा. बाजारसावंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बाजारसावंगी येथील बाळू राधाकृष्ण नलावडे यांनी २१ एप्रिल रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी … Read more

गरवारे मैदानावर हजारो वाहने भंगारात पडून; क्रीडा विभाग मात्र अंधारात

aurangabad

औरंगाबाद – शहरातील गरवारे मैदानावरील खुल्या जागेवर मनपाने तीन वर्षांपूर्वी १३२ तर गेल्या तीन दिवसात फक्त २१ भंगार वाहने टाकण्यात आली आहेत. उर्वरित वाहने पोलिसांनी टाकली असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र मैदानाच्या परिसरात हजारो वाहने भंगार वाहने पडून असताना मैदानाची जबाबदारी असलेला क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे. मनपाच्या गरवारे मैदानावर दररोज … Read more

ग्रामीणमध्ये कोरोना चाचण्या वाढवा – जिल्हाधिकारी

Collecter

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून रुग्ण बरे होण्याचा दर 97.42 टक्के आहे. मात्र आता सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिलेली असल्याने संसर्ग वाढणार नाही याची अधिक खबरदारी घेत शहराप्रमाणे ग्रामीणमध्ये कोवीड चाचण्या वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोवीड उपाय योजनांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील … Read more

लाखो रुपये खर्चूनही क्रिडा संकुलाचे काम रखडलेलेच

Sport , Sports Complex

औरंगाबाद – गंगापूर शहरातील क्रीडा संकुलाच्या कामावर 97 लाख रुपये खर्च करूनही अजून काम अपूर्णच आहेत क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत क्रीडा संघटक व समितीच्या सदस्यांनी या बाबीकडे लक्ष गेल्यानंतर चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. या समितीने तातडीने क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी केली. गंगापुर तालुका क्रीडा संकुलाची बैठक संकुल समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या … Read more

खुलताबाद, वेरुळ मार्गावरील अवजड वाहतूकीत बदल

औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद आणि वेरुळ या धार्मिक स्थळांना श्रावणमासा निमित्ताने मोठं संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. यावर्षी मात्र कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असली तरी भाविक जातीलच अशी शक्यता असल्याने पोलिसांनी शनिवार व सोमवारी या मार्गावरील जड वाहतूक वळविण्यात आली आहे. • खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा – – औरंगाबादहून कन्नड, धुळ्याकडे जाणारी सर्व जड वाहने … Read more

मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; उच्च न्यायालयात जनहित याचिका

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेले असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याचिकेवरील पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर काही दिवसांपूर्वी शहरात बॅंकींगच्या परिक्षेसाठी अपंग विद्यार्थी आला … Read more