हवामानाच्या अचूक अंदाजसाठी सी.बँड रडार बसविण्यास परवानगी

औरंगाबाद – औरंगाबादेत हवामानाच्या अचूक अंदाजसाठी सी बँड रडार डॉपलर बसविण्यास संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून, सी बँड डॉपलर रडार संदर्भात आग्रही मागणी व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान … Read more

राजुरच्या गणरायाचे आता ऑनलाइन दर्शन

rajur

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध राजूर येथील राजुरेश्वराचे भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी आजपासून अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर लाईव्ह यु ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना आता घर बसल्या राजुरच्या गणरायाचे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या राजूर येथील राजुरेश्वर आज या मंदिरात राज्यातून तसेच राज्याबाहेरून भाविक … Read more

महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करून केंद्राला चालवायला द्या; खासदार प्रितम मुंडेंचा घणाघात

बीड – महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांत सरकारला एकही मुद्द्यावर यश आलेले नाही. प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मग, महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या, असा टोला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रितम मुंडे यांनी लगावला. ओबीसी आरक्षण देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा राज्याचा आरोप … Read more

सिंचन भवनासमोर तरुणाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

petrol

औरंगाबाद – शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका तरुणाने सिंचन भवनासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे या परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या ठिकाणी उडवलेला गोंधळ थांबवला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याविषयी अधिक माहिती अशी की लघु पाटबंधारे … Read more

एकाच दोरीने प्रेमी युगुलाचीआत्महत्या

औरंगाबाद  | सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथील राजनंदनी कैलास दांडगे आणि शरद आस्तिक राव दांडगे यांनी शेतातील एका झाडाला एकच दोरीने गळफास घेऊन दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्रकार आज रोजी घटला आहे. सदर घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते हे आपल्या कर्मचाऱ्या सह जाऊन मृतदेहांचा पंचनामा करून सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी … Read more

लस न घेतल्यास संबंधितांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणा-या चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी ती घ्यावी, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 25 नोव्हेंबरपासून सुरु … Read more

जिल्हा परिषदेत ‘संभाजीनगर’ चा ठराव

औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. याविषयी राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. परंतु, आगामी महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत … Read more

‘नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’ चा आदेश मागे घ्या, अन्यथा… 

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात लसीकरण व्हायलाच हवे मात्र प्रशासनाने सक्ती करू नये. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात प्रशासनाला आलेले अपयश शहरवासीयांच्या माथी थोपवू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत नुकताच काढलेला फतवा पुढील २४ तासात मागे घ्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकार्‍यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा औरंगाबाद मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने क्रांतीचौक येथील पेट्रोल … Read more

विधानपरिषदेवर प्रज्ञा सातव बिनविरोध ! भाजपच्या संजय केणेकरांची माघार 

kenekar

औरंगाबाद – हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामूळे राज्यात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर निवडणूक बिनविरोध व्हावी ही काँग्रेसची आधीपासून इच्छा होती. मात्र भाजपाने उमेदवार दिल्याने राजकारणाच्या या पैलुवर … Read more

लसीकरणामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

Crime

 ओैरंगाबाद – चित्तेगाव उपकेंद्र येथे काल (दि 20) लसीकरण मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या गोरख रामभाऊ शिंदे व निलाबाई शिंदे यांच्यावर बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये आज गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी त्यांना त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. लसीकरणाच्या राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वत: या … Read more