सुरज शेवाळे : कोरोना काळात रात्र- दिवस धावणारा मलकापूरमधील एक अवलिया

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत भयावह परिस्थितीत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करायचा असो की दुसऱ्या लाटेत भुकेल्यांना प्रेमाचे दोन घास जेवण द्यायचे. झोपडपट्टी, रोजदारी बंद असलेल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी मलकापूर शहरातील एकच अवलिया रात्र- दिवस धावत आहे. या गरजू लोकांच्या आयुष्यात एक छोटासा आशेचा सुरज निर्माण करणाऱ्या अवलियाचे नांव सुरज शेवाळे असे आहे. मलकापूर … Read more

‘सेवा हेच संघटन’ : शेखर चरेगांवकर यांचेकडून उरुल व तळबीड येथील कोव्हीड सेंटरला मदत

Karad Shekher Charegaonkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे राज्य सहसंयोजक शेखर चरेगांवकर यांनी व्यक्तीगत स्तरावर पाटण तालुक्यातील उरुल येथील कोव्हीड केअर सेंटरला ३० बेड सेट (गादी, बेडशीट, उशी व चादर) व कराड तालुक्यातील तळबीड येथील केअर सेंटरला ४० कॉट्स भेट दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला नुकतीच … Read more

प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कर्ज काढून नुकसानग्रस्तांना मदत करावी : नाना पटोले यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या भागाची आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पाहणी केली जात आहे. यादरम्यान त्यांनी मिरकवाडा बंदराला भेट दिली. तेथील भेटीनंतर पटोले यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. “येथील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्ज काढावे. कोणत्याही परिस्थितीत येथील लोकांना मदत करावी,” अशी मागणी … Read more

संघासाठी लसीकरण केंद्रावरील विषय संपला, आता राजकारण कोण करत आहे तो ज्यांचा त्याचा प्रश्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी 10 मे रोजी लसीकरण केंद्रावरील जो काही प्रकार घडला आहे. त्याविषयी राष्ट्रीय संघाचा राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला असे म्हटले गेले. यात काही राजकीय अजेंडा आहे? संघाला तेथील बेबनाव, अव्यवस्था अवडलेली नाही, सामान्य माणसाला होणार त्रास बघावला नाही. त्यामुळे आम्ही पुढे आलो होतो. आता या विषयाचे … Read more

करोना सोबतच्या या युद्धामध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांकडून मदत घेण्यास दिला नकार; जाणून घ्या या निर्णयामागील कारण

United nations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारारेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, एकीकृत पुरवठा साखळीच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांनी पुरविलेल्या मदतीची ऑफर भारताने नाकारली आहे आणि सोबतच म्हटले आहे की, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देशाला आवश्यक तार्किक पाठबळ आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात यूएनचे सरचिटणीस उप प्रवक्ते फरहान हक म्हणाले, गरज पडल्यास आम्ही आमच्या एकीकृत पुरवठा … Read more

लॉकडाऊन इम्पॅक्ट | पुण्यातील अपंग रिक्षाचालकाच्या संघर्षाला हवाय मदतीचा हात

पुण्यातील दिव्यांग रिक्षाचालक संजय राजू काळे यांना लॉकडाऊन काळात वाढलेल्या अडचणींमुळे तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील कामगारांसाठी हिरो

कर्नाटक मध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी त्यांनी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या कामगारांना निरोप देतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खाद्यतेलासाठी फिरणाऱ्या आजीला भेटली खाकीतील माणुसकी

कराड प्रतिनिधी |  सकलेन मुलाणी पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला रस्त्यात आज्जीबाई भेटल्या. कुठे चाललाय म्हणून विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, घरात आठ दिवसापासून गोडेतेल नाही. त्या पोलिसाने त्यांना दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकात बोलावून गोडेतेलाची पिशवी दिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि खाकीतल्या माणुसकीचे दर्शनही घडले. कराडमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. … Read more

“कोणीही उपाशी राहू नका, आम्ही आहोत..!!” – पुण्यातील सेवाभावी संस्थांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,बुलढाणा आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी ८ ते ९ पर्यंत पोहे व उपीट या नाश्त्याचे वाटप केले जाते. तर दुपारी १२ ते १ व रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत ताजे आणि स्वच्छ जेवण देण्यात येत आहे.

रस्त्यांवर पडलेल्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराडची माणुसकी या ग्रुपचे सदस्य असणारे डॉ. सोळंकी आणि संदिप कोटणीस हे उंब्रज (ता. कराड) येथील मेडिकल कॅम्प संपवून कराडला येत होते. यावेळी उंब्रजच्या वेशीवर पोहचाताच त्यांच्यासमोर एक वृद्ध गृहस्थ रस्त्यांवर आडवे पडले होते. मात्र या रस्त्यांवर वेदनांनी कळवळत असणाऱ्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार मिळाल्याची माहीती संदिप कोटणीस यांनी … Read more