हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात बस दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू

Accident

शिमला : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक बस दरीत कोसळल्यामुळे मोठा अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये 12 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती अशी कि, बस शैनशेरहून कुल्लूला जात असताना जंगला गावाजवळील एका वळणावर सकाळी साडेआठला दरीत कोसळली(Accident). अपघातग्रस्तांच्या नातलगांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तीन … Read more

साताऱ्यातील ट्रेकर्सच्या ट्रव्हल्सचा हिमाचल प्रदेशात अपघात : चालकासह 6 जण जखमी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हलला अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. या ट्रव्हल्समध्ये 51 जण होते. दोन ट्रव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये चालकासह अन्य 6 जण जखमी झाले आहेत. मनाली येथून मिळालेली माहिती अशी, हिमाचल प्रदेशाातील मंडी येथे दोन ट्रव्हल्सचा अपघात झाला आहे. … Read more

रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने केला नवा प्रयोग, जगात पहिल्यांदाच बसवण्यात आले आहेत असे बॅरिअर

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी एक नवीन प्रयोग केला आहे. रोलिंग बॅरियर रेलिंग सिस्टीम बसवून रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगात पहिल्यांदाच भारतात अशा प्रकारचा अडथळा वापरण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा अडथळ्यांमुळे डोंगराळ भागात रस्ते अपघात रोखण्यास मदत होईल. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचा पायलट प्रोजेक्ट … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार; 6 महिन्यांनी नराधमाला झाली अटक

rape

बिलासपूर : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका तरुणानं अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीला मारहाण करण्यात आली आहे. तसेच आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील सर्वांना ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली. अखेर सहा महिन्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक … Read more

हृदयद्रावक! “माझ्या मागे रडू नका, कारण…” फेसबुकवर पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

सोलन : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. २९ वर्षीय मुकुल वारिया हा तरुण लग्न आणि इव्हेंट्सच्या डेकोरेशनचे प्रोजेक्ट घेत होता. … Read more

कोरोनानंतर देशात आता ‘बर्ड फ्लू’चं संकट! ‘या’ राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट पूर्णपणे टळत नाही, तोच देशावर आणखी एका साथीचं संकट आलं आहे. कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’चं नवं संकट ओढावलं आहे. या राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप ‘बर्ड फ्लू’चं संकट नाही आहे. याशिवाय बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more

आमच्या राज्यात कुणालाच हरामखोर किंवा नमकहराम म्हटलं जात नाही ; कंगणाने पुन्हा साधला राऊतांवर निशाणा

kangana and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणल्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणाला उद्देशून हरामखोर हा शब्द वापरला होता. कंगना ते अजूनही विसरली नाही. आता मात्र कंगणाने संजय राऊत याना टोला लगावला आहे. आमच्या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला … Read more

नवीन वर्षापूर्वी मदत पॅकेज तयार करण्यात गुंतले सरकार, पर्यटन क्षेत्रासहित कोणाकोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर करू शकते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या सेक्टरला पॅकेजची सर्वात जास्त आवशक्यता आहे त्याची माहिती गोळा केली जात आहे. फूड, ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रांसाठी एक मोठा मदत पॅकेज जाहीर करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कारण या साथीचा सर्वाधिक फटका त्यांना … Read more

लडाखच्या कारगिलमध्ये जाणवले भूंकपाचे धक्के; जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाही हादरले

लेह । लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ४.५ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. कारगिल येथे दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचे केंद्र कारगिलच्या वायव्येस ११ किलोमीटर अंतरावर आहे. लडाखमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्का जाणवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी अडीच वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी … Read more