मुंबई येथून परतलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह, जालना जिल्ह्यात रुग्ण संख्या 44

जालना प्रतिनिधी । मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालन्यात पोहचलेल्या दोन भावांसह एकाच्या पत्नीचा अशा तीन जणांचे अहवाल काल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून आता जालना जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 44 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. जालना तालुक्यातील वडगाव वखारी येथील मूळ रहिवाशी असलेले दोन भाऊ आणि या दोघांपैकी एकाची पत्नी असे … Read more

जालना जिल्ह्यात आज पुन्हा ७ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २५ वर

जालना प्रतिनिधी । मालेगाव येथुन परतलेल्या व भोकरदन येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांचा, शहरातील एका खासगी दवाखान्यातील 48 वर्षीय डॉक्टर, 28 वर्षीय प्रशासकीय अधिकारी तसेच मुंबई येथुन परतलेल्या व मंठा येथील कोव्हीड सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 26 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 15 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला असुन सर्वांना … Read more

गर्भवती महिलेसह जालन्यात कोरोनाचे ३ नवे रुग्ण ; जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ११ वर

जालना प्रतिनिधी । आठवडाभरानंतर जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता एकुण बाधितांची संख्या ११ झाली आहे. नवीन रूग्णांमध्ये अंबड तालुक्यातील कानड गाव येथील दोन रूग्णांचा समावेश असून जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका गर्भवतीचा समावेश असल्याची माहिती रविवारी (ता. दहा) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठाडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात ता.१ मे पर्यंत … Read more

रेडझोन औरंगाबादेतून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांचेही निलंबन होणार का?

जालना प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांनी खोटारडेपणा उघडकीस आणलेल्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय जिल्ह्यांच्या सीमा ओलांडू नयेत अशा सूचना असतानादेखील बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे रेड झोन असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य … Read more

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर … Read more

काँग्रेसचा ‘हा’ आमदार आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार? महाविकासआघाडीतील नाराजी नाट्य शिगेला

जालना | आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची बातमी ताजी असतानाच आता महाविकास आघाडीला अजून एक झटका बसला आहे. काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर ते पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे ते राजीनामा सोपवतील. “हम वफा कर के … Read more

‘माझ्या पप्पांचा पगार वाढवा मग मला चांगले शिक्षण मिळेल; पहिलीच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

श्रेया हराळे या पहिलीत शिकणाऱ्या मुलीने  आपल्या बापाची व्यथा मांडली आहे. ‘माझ्या पप्पांचा पगार वाढवा मग मला चांगले शिक्षण मिळेल, पगार कमी असल्याने त्यांना ओव्हर टाइम करावा लागतो

‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’; रावसाहेब दानवे यांच्या वाचाळगिरीचा कथित विडिओ व्हायरल

‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’ असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांचे प्रचार सभेतील एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य करताना ते दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना दानवे असं बोलले होते असे समजत आहे. या संदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

लाखो रुपये असलेली बॅग फेकून सहाय्यक निबंधकाचा पोबारा

जालना प्रतिनिधी । अंबड शहरातील रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक आपल्या कार मध्ये कापडी बॅग ठेवत असताना बॅग मधून पैशाचे बंडल खाली पडल्याने त्यांना पैशाची बंडल खाली पडल्याची विचारणा केली असता साह्यक निबंधकाने पेशाने भरली बॅग तशीच खाली फेकून पळ काढल्याची घटना अंबड शहरात निबंधक कार्यालयाच्या आवारात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

आंदोलनकर्त्या पूजा मोरेंची मोदींच्या दौऱ्या आधी अटक अन सुटका

उस्मानाबाद प्रतिनिधी | जालन्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री गो बॅक अशा घोषणा देत ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी पूजा मोरे यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता मोरे यांचा मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनीही चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी  औरंगाबाद येथे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उस्मानाबामध्ये आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या … Read more