मेंढ्यात अवैध दारू विक्रेत्याची व्यसनमुक्त संघाच्या कार्यकर्त्यांकडून धरपकड

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात मेढ्यासह परिसरात अनेक महिन्यापासून अवैध दारूविक्री केली जात आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे व्यसनमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांची आज धरपकड केली. त्याच्या या कारवाईत एका दारूविक्रेत्यास त्यांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

प्रतापगड कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर : 13 मार्च रोजी होणार मतदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतापगड कारखाना लि. सोनगाव करंदोशी या संस्थेची … Read more

तब्बल 13 वर्षानंतर आ. शशिकांत शिंदे यांचा मेढा येथे आज जनता दरबार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. आमदार शशिकांत शिंदे याच्या उपस्थितीत तब्बल 13 वर्षांनी जावली पंचायत समितीमध्ये आज दुपारी 1 वाजता जनता दरबार भरवण्यात आला आहे, अशी माहिती जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावतीने देण्यात आली. आ. शशिकांतजी शिंदे हे जावलीचे आमदार होते तेव्हा … Read more

शेतकरी अडचणीत : महाबळेश्वर, जावळीत पावसाच्या माऱ्याने स्ट्राॅबेरी शेताच्या बांधावर फेकली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन चालू आहे, मात्र अवकाळीच्या तडाख्याने स्ट्राॅबेरी फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आलेली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना सध्या स्ट्रॉबेरीचा खच पडलेला … Read more

धक्कादायक ! साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच बलात्कार

Rape

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यातील जावळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हि घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. … Read more

जावलीच्या बांधकाम अभियंत्यांनी गहाळ केला भूस्खलनाचा अहवाल?

सातारा । महाबळेश्वर धामणेर रस्त्याचे ३१० कोटी रुपायाचे काम सुरु आहे. यामधील महाबळेश्वर ते केळघर रस्त्याच्या दरम्यान काळकडा ते रेंगडी गावापर्यतचा भुगर्भ सर्वे आय आय टी पवईच्या शास्त्रज्ञानी २०१८ साली केला होता. सर्वे केल्यानंतर काळाकडा ते रेंगडी गावादरम्यान मार्गदर्शक व धोका टाळण्याकरीता उपाययोजना करण्याकरीता बहुमोल सुचना आय आय टी पवईच्या भुगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालात देण्यात आल्या … Read more

कराडनंतर आता जावळी तालुकाही कंटेनमेंट झोनमध्ये, ‘हि’ २८ गावे पूर्णपणे सील

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जावली (मेढा) यांनी जावली तालुक्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने जावली तालुक्यातील 28 क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावानुसार जिल्हादंडाधिकारी … Read more