फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

आमचं सरकार हे काही चौकशी  सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ‘हे’ नाव निश्चित

मुंबई प्रतिनिधी | राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचे नावही निश्चित झाले आहे. बुधवारी रात्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असून अजित पवार आणि जयंत … Read more

शरद पवारांना राजकारणात हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सुर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार – जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका स्पष्ट केली. रविवारीही अजित पवार यांनी ट्विट करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सांगितले. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांच्या सदर … Read more

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील, अजित पवारांचे सर्वाधिकार राष्ट्रवादीने काढले

पक्षांतर्गत बंडाळी करून पक्षाला फुकटचा शहाणपणा करणाऱ्या अजित पवार यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांना असलेले सर्व अधिकार काढुन घेण्यासोबत त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ कमिटीने केली आहे. शनिवारी सायंकाळी याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात आला.

आम्हाला आमचं वास्तव माहित आहे, राष्ट्रवादी स्वप्नरंजनात नाही – जयंत पाटील

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसतांना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते असे संजय राऊत वारंवार सां

काँग्रेसला मतदान करून महापुराचा बदला घ्या – जयंत पाटील

महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शो बाजी केली. पुरामुळे सात दिवस जनतेचे आतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. महाअघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिरसमोर सभा पार पडली. या सभेत आ.जयंत पाटील बोलत होते. सभेला विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘पैलवान’ वक्तव्यावरून जयंत पाटलांना हसू आवरेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार प्रचार सभेत आपण तेल लावून लढाईसाठी तयार आहोत असे सांगत आहेत, मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळूदेत कि तेल लावलेला मुख्यमंत्री कसा दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

समाजवादी नागनाथअण्णा नायकवडींच्या नातूने उमेदवारीसाठी केला हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात विचारधारा रसातळाला गेल्याचा प्रत्येय २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. याचाच एक नव्याने दाखला देण्याचा प्रयत्न गौरव नायकवडी यांनी केला आहे. त्यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना आज मुंबईमध्ये घडली आहे. भाजपकडून तिकिटासाठी आग्रही असणारे गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेत गेले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

शिवसेना प्रवेशाबाबत छगन भुजबळ यांनी दिले हे उत्तर

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार अशा चर्चा माध्यमात झळकत होत्या. मात्र त्या चर्चा शक्यता आणि सूत्रांनी दिलेल्या बातम्यांना छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहे. तसेच त्यांनी मी साहेबां सोबत आहे. मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही असेम्हणले आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक … Read more