सातार्‍यात ९ तर कराडात ४ रुग्ण कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच पुणे, मुंबईवरून आलेल्या काहींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिनांक १५ मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले ७ प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात … Read more

खासदार श्रीनिवास पाटीलांचेही वर्क फ्राॅम होम, कुटुंबातील सर्वांची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३४२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी २२ मार्च च्या दिवशी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे देशात सर्वत्र शुकशूकाट असून वर्क फ्रोम होम पद्धतीने काम चालले आहे. सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रोम होमचा पर्याय … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा कोरोनासंशयीत! चिली देशातून आलेला ३४ वर्षीय युवक जिल्हा रुग्नालयात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा अनुमानित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. त्याला सर्दी असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा … Read more

कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ, पहा काय म्हणतायत मंगला बनसोडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भावामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या तमाशा मंडळांवर कर्ज काढून आपल्या ताफ्यातील कलावंतांना जेवण घालण्याची वेळ आली आहे. शिमग्या पासून महाराष्ट्रातल्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते. मात्र कोरोना मुळे प्रसिद्ध देवस्थान तसेच गावोगावच्या गर्दीच्या यात्रा रद्द झाल्याने मोठ्या तमाशा मंडळांसह लहान तमाशा मंडळाचा लाखो रुपयाच्या यात्रांच्या … Read more

शहीद जवानांच्या वीरपत्नींना ठाकरे सरकारकडून ‘हे’ गिफ्ट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहीद जवानांच्या वीरपत्नींना घरफळा माफ करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. सरकार शहीद जवानांच्या कुटूंबियांसमवेत कायम आहे. अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहीद जवानांच्या कामाचा आदर करत वीरपत्नींचा गौरव करण्याच्या उद्देशानव आम्ही हा निर्णय घेतला आहे. वीरपत्नींचा … Read more

हुश्श! सातार्‍यातील ‘त्या’ कोरोना संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह पण…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातले असून सातार्‍यातही कोरोनाचा एक रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर कोरोना संशयिताचा आज मेडिकल रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सातारकरांनी आता हुश्श म्हणत निश्वास सोडलाय. रविवारी संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला संशयित सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. … Read more

कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना झालंय तरी काय ? महिलांनी केलं बोंबाबोंब आंदोलन

पालिकेने दिलेल्या घरकुलांची पाहणी केली असता या ठिकाणी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचं आणि ड्रेनेजचं पाणी एकत्रच मिसळत असून पाण्याच्या पाईपचीही अनेक ठिकाणी मोडतोड झाली आहे. याच ठिकाणी भयंकर अस्वच्छता असुन कचऱ्याचे ढीगसुद्धा साठल्याचं पाहायला मिळत आहे.

#hellomaharashtra

कराडमध्ये अतिक्रमणाविरोधात महिलादिनीच महिलांचं ‘भीक मांगो’ आंदोलन

कराडमधील महिला वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव झाल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर भीक मांगो आंदोलन केलं.

कराडमध्ये तिसर्‍या दिवशीही 300 अतिक्रमणावर हातोडा

कराड नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सुरू केलेली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी तिसर्‍या दिवशीही सुरु होती. या मोहिमेत नगरपालिकेने 300 अतिक्रमणावर हातोडा मारला.

कराड जनता सहकारी बँकेनं केलं तब्बल १८१ कोटींचं विनातारण कर्जवाटप; ठेवीदार आक्रमक

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड जनता बँकेकडून १८१ कोटी विनातारण कर्जवाटप केल्याचे समजताच ठेवीदारांनी कर्मचार्‍यांना बँकेतून हाकलून लावलं. २३ तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बँकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला. कराड जनता सहकारी बँकेत ठेवलेल्या ठेवी गेल्या अडीच वर्षापासून मिळत नसून कोणताच ठोस निर्णय होत नसल्याने ठेवीदारांनी मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मांडला. बँकेचे कार्यकारी … Read more