कराडच्या नगराध्यक्षांना कोरोनाची लागण 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदेचा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्रास जाणवू लागल्यानंतर शिंदे यांनी दवाखान्यात तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्या पासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दगदग व धावपळ झाल्याने मागील दोन दिवसापासून थोडासा ताप आल्याने … Read more

सातारा जिल्ह्यात 95 नवीन कोरोनाग्रस्त; ‘या’ गावांत सापडले पहिल्यांदाच रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 89 आणि रात्री उशीरा अँटिजन टेस्ट किटद्वारे 6 असे एकूण 95जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. वाई तालुक्यातील बोपेगाव येथील 41 व 35 वर्षीय पुरुष, … Read more

कऱ्हाड पुन्हा हादरले, तिघेजण पाॅझीटिव्ह; मध्यवस्तीत शनिवार पेठेत दोघेजण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराला कोरोना विषाणुने पुन्हा एकदा विळखा घातला आहे. आज आलेल्या रिपोर्टनुसार कराड शहरात ३ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कराड शहरातील पायर्‍याखालील भागात एक तर बूधवार पेठऔंधकर हाॅस्पिटल परिसर व रणजित टाॅवर येथिल असे तीन जण बाधित आढळल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण सापडले … Read more

सातारा जिल्ह्यातील 69 नवीन कोरोनाग्रस्त; सहा बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील एकूण 69 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील* पसेवाडी येथील 40 वर्षीय महिला, बामणोली येथील 50 … Read more

धक्कादायक! सून कोरोनाबाधित झाल्याने सासऱ्यांचा ह्‌दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वसंतगड (ता. कराड) येथील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आली असून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र सून कोरोनाबाधित झाल्याचा धक्का बसल्याने सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे गावावर एकच शोककळा पसरली आहे. गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये वसंतगड येथे पंधरा दिवसापूर्वी मुंबईहून आलेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह … Read more

सातारा जिल्ह्यात 70 नवे कोरोनाग्रस्त; दोन बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 56 प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला … Read more

भारतात आतापर्यंत ९९ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर १ हजार ३०२ पॉझिटिव्ह- IMA

नवी दिल्ली । इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करतांना देशातील 99 डॉक्टरांनी आपला जीव गमावला असल्याचं म्हटलं आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार, कर्तव्यावर असताना 1 हजार 302 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी 99 जणांचा मृत्यू झाला. ज्या 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला, त्यापैकी 73 डॉक्टर वय वर्ष 50 वरील … Read more

मामा मुंबईहून लग्नाला आला आणि सगळं वऱ्हाड कोरोनाग्रस्त झाले 

मेढा प्रतिनीधी । दिवसेंदिवस जावळीत कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रामवाडी पाठोपाठ आता केळघर विभागातील पुनवडी गाव कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहे. गावात जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुबंईहून भाचीच्या लग्नासाठी मामा मोठ्या उत्साहात गावाकडे आला, मात्र तो येताना सोबत कोरोना कुरवला घेऊन आला आणि अख्ख वऱ्हाड कोरोनाग्रस्त केलं. पुनवडी गावचे सुरक्षा समिती अध्यक्षांच्या घरातीलच हा … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ; एकाच दिवसात सापडले तब्बल १२० नवे कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुने धुमाकुळ घातला असून आताच आलेल्या रिपोर्टनुसार एन सी सी एस-84, कृष्णा-06,  नारी-13, आघारकर-3, आय आय एस ई आर-14 असे सर्व मिळून 120 जण नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more