भारतात आतापर्यंत ९९ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर १ हजार ३०२ पॉझिटिव्ह- IMA

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करतांना देशातील 99 डॉक्टरांनी आपला जीव गमावला असल्याचं म्हटलं आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार, कर्तव्यावर असताना 1 हजार 302 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला, त्यापैकी 99 जणांचा मृत्यू झाला.

ज्या 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला, त्यापैकी 73 डॉक्टर वय वर्ष 50 वरील होते. 19 डॉक्टराचं वय 35 ते 50 च्या दरम्यान होतं. तर 7 डॉक्टर असेही होते ज्याचं वय 35 वर्षाहून कमी होतं, असं सांगण्यात आलं आहे. कोरोना संसर्ग झालेल्या 1302 डॉक्टरांपैकी 586 प्रॅक्टिसिंग डॉक्टर, 566 रेजिडेंट डॉक्टर आणि 150 हाऊन सर्जन असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे डॉक्टरांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास सर्वप्रथम डॉक्टरांना त्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. आयएमएने म्हटलं आहे की, ‘कोरोनाची प्रकरणं कमी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रथम स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. जर फ्रन्टलाईनवर उभे असलेले डॉक्टरचं आजारी पडले तर आरोग्याच्या सुविधाही डळमळीत होतील.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment