Satara News : कराडमध्ये 24 नोव्हेंबरपासून यशवंत कृषी औद्योगिक प्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार असलेचे माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम … Read more

Satara News: कराडातील ठाकरे – पवार – गांधींच्या सभांच्या गर्दीचे उच्चांक जरांगे-पाटील मोडणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर येत्या शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर शिवाजी स्टेडियमवर उच्चांकी गर्दी पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांच्या सभांची गर्दी अनुभवली आहे. या … Read more

Satara News : मनोज जरांगे-पाटलांच्या कराडातील सभेचं ‘नियोजन’ ठरलं!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यास दि. 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर पासून 23 पर्यंत सहा टप्प्यात दौरा होणार आहे. त्यामध्ये जरांगे पाटलांची तोफ हि दि. 18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या सातारा … Read more

पहाटेच्या सुमारास स्फोटाने कराड हादरलं; 4 जण गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहत्या घरात पहाटे स्फोट होऊन चार जण जखमी झाल्याची दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास कराड शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनी लगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका भीषण होता कि त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर जावून आदळली. त्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले असून ४ जण गंभीर जखमी तर अन्य तीन जण … Read more

Satara News : कराड बाजार समितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उच्च न्यायालयाच्या संरक्षक भितींबाबतच्या आदेशाला दिली स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड बाजार समितीची 1986 साली बांधलेली संरक्षण भिंत पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. स्थगिती आदेशाची माहिती मिळताच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक व व्यापाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच कर्मचारी, व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीची संरक्षक … Read more

Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश … Read more

Satara News : कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेबाबत नेमकी काय आहे परिस्थिती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दीड दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्याची आरोग्य यंत्रणेची लक्क्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘हॅलो महाराष्ट्र’ने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे? याबाबत रिऍलिटी चेक केला. यावेळी या ठिकाणी सध्या तरी रुग्णांना योग्य प्रकारे सेवा दिली जात असून … Read more

Satara News : ढोल ताशांच्या गजरात अन् डीजेच्या ठेक्यात सातारकरांकडून गणरायाला निरोप…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ढोल ताशांच्या गजरात तसेच झांज पथकांच्या गजरामध्ये आणि लेझीम पथकांच्या साक्षीने “गणपती बाप्पा मोरया’ पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांच्या निनादात सातारा जिल्हा वासियांनी गणरायाचे विसर्जन केले. सातारा जिल्ह्यामध्ये असेल्या एकूण 3 हजार 921 सार्वजनिक गणेश मंडळांचे व घरगुती गणपतीचे नदी, कृतीम जलकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी कराड, वाई, फलटण, सातारा, … Read more

कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार … Read more

Satara News : कराड तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये पोलिसांचे संचलन; आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 48 जणांना नोटीसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जमावबंदी लागू करून मोर्चा, आंदोलनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सव तोंडावर असल्याने हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग … Read more