कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार नाही. स्वतः चा स्वाभिमान विकून मतदान करणार नाही, असे मत व्यक्त करत राज्याचे माजी मुखमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली.

कराड दक्षिणेत काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला चचेगाव येथून प्रारंभ झाला. विभागात विंग, घारेवाडी, येरवळे, पोतले, येणके येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर कोळे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, पंचायत समिती माजी उपसभापती रमेश देशमुख, राजेंद्र भिसे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, सुभाषराव पाटील – येरवळेकर, नामदेव पाटील, कोळेच्या सरपंच भाग्यश्री देसाई, उपसपंच सुधीर कांबळे, गिताजंली थोरात, येणकेचे सरपंच निकाहत मोमीन, विंगच्या सरपंच शुभांगी खबाले, झाकीर पठाण, विठ्ठल पाटील, अमोल कांबळे, अनुप कात्रे, संजय माळी, विद्याताई थोरावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. चव्हाण म्हणाले, केंद्र अणि राज्यासमोर काय प्रश्न आहेत, हे सामान्य जनतेला कळले पाहीजेत. भारत जोडो जनसंवाद पदयात्रा यासाठी काढली आहे. असे सांगून श्री. चव्हाण पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भिती आहे. ते यावेळी निवडून आले, तर लोकशाही टिकणार नाही. चीन अणि रशियासारखी हुकूमशाही येथेही निर्माण होईल. तुम्हाला अधिकार राहणार नाहीत. मोदीच्या नऊ वर्षाच्या काळात देशावर कर्जाचा एवढा बोजा झाला आहे. त्यातून देश वाचणार कसा असा प्रश्न आहे.

अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, काँग्रेसने जनसंवाद यात्रा एका विशिष्ट हेतूने सुरू केली आहे. आताच्या भाजप सरकारची विचारसरणी देशाला अणि लोकशाहीला घातक आहे. हे सर्वसामान्य जनतेला कळली पाहिजे. खास करून तरूणांना समजली पाहिजे. तुमच्यात मतभेद असाव्यात. पण त्याचा फायदा इतर कोणाला घेऊ देऊ नका.

यावेळी अजितराव पाटील – चिखलीकर, शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, रमेश भिसे, रमेश देशमुख यांची भाषणे झाली. राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री देसाई यांनी आभार मानले.

तेलावर कर लादून 30 लाख कोटी मोदीनकडून गोळा

सात हजार शाळांची खासगी करणाकडे वाटचाल सुरू आहे. गॅस अणि तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. नवीन नोकर भरती नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारला पैसे नाहीत. काँन्ट्रॅक बेसवर नोकऱ्या देत आहेत. फक्त तेलावर कर लादून 30 लाख कोटी मोदीने गोळा केले आहेत. तेच तुम्हाला फिरवत आहेत. लोकशाही टीकवाची म्हणजे स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे.