दुःखद निधन : जेवणाचे ताट करायला सांगितले अन् अशोकराव भावकेंना कारने उडविले

कराड | तालुक्यातील घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव जग्गनाथ भावके (वय-52) यांचे मंगळवारी रात्री अपघातात निधन झाले. घोगाव गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर उभे असताना त्याना कारने 11 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, घोगाव येथील संतकृपा काॅलेज समोर अशोक भावके यांचे मातोश्री … Read more

प्रसिध्दीपत्रक : मलकापूर नगरपरिषदेच्या 7 लाख 76 हजारांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी

Malkapur

कराड | मलकापूर नगरपरिषदेचे सन 2022-23 या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करणेत आली. सदर अंदाजपत्रकामध्ये सन 2022-23 या सालाकरीता कोणतीही कर वाढ न करण्यात आलेली नाही. सन 2022-23 सालची एकूण महसुली व भांडवली एकूण जमा 69 कोटी 59 लाख 49 हजार 702 एवढी गृहीत धरली असून खर्च 69 कोटी 51 लाख 73 हजार … Read more

रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे बळीराजा संघटनेचे गुरूवारी आंदोलन : साजिद मुल्ला

Sajjid Mulla

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुहागर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम चालू आहे. कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ठ दर्जाचे काम केले जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवारं सांगितले जावूनही केवळ टक्केवारीने बरबटलेले अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करित आहेत. तेव्हा कामाचा दर्जा न सुधारल्यास कराड- विटा रोडवर बळीराजा … Read more

भोसले गटाची सत्ता : वाठार सोसायटीत सत्तांतर तर बेलवडे बुद्रुक विजयी परंपरा कायम

कराड | कराड दक्षिणमधील वाठार व बेलवडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत डाॅ. अतुल भोसले गटाने बाजी मारली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या वाठार विकास सेवा सोसायटीत राजेश पाटील – वाठारकर समर्थक गटाचा डॉ. अतुल बाबा भोसले गटाने 10-3 असा धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. तर बेलवडे बुद्रुकमध्ये भोसले गटाने विजयी परंपरा कायम … Read more

पुणे- मिरज रेल्वे दुहेरीकरण भूसंपादनासाठी सातबारानुसार जमिनीची मोजणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- मिरज रेल्वे दुहेरीकरण भूसंपादनासाठी आज कोपर्डे हवेली येथील शेतकऱ्यांची यादववाडी हद्दीतील एकूण 10 गट नंबरची जमिनीची सयुंक्त मोजणी सातबारानुसार करण्यात आली. रेल्वेच्या हद्दीचे कोणतीही कागदपत्रे पुरावे नसल्याने शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेखाकडील गटांच्या रेकॉर्डनुसार मोजणी करण्यात आली. कोपर्डे हवेली येथील अजून जवळपास 90 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा … Read more

शाब्बास रे पठ्ठ्या ! आठ लाख मुलांच्यातून गोटेवाडीच्या पंकज आमलेची बाजी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी लहरों से डर कर नौका पार नही होती… कोशिश करने वालों की कभी हार नही होती, असं म्हटलं जातं. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनंत अडचणींचा सामना करत एखादं यश मिळतं. त्याला ते तावून-सुलाखून मिळाल्या सारखं असतं गोटेवाडीच्या पंकज आमले यांनी पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल पोलीस उपनिरीक्षकपदी बाजी मारली आहे. पंकजने नव्या … Read more

मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या एकाला चाकूने भोकसले

chaku

कराड | मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला जिवे मारण्याची धमकी देत भोसकले. जुने घारेवाडी (ता. कराड) येथील समाज मंदिराजवळील रस्त्यावर रविवार दि. ६ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अमर रघुनाथ पवार (रा.घारेवाडी, ता. कराड) हे चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तेथीलच लक्ष्मण तुकाराम जाधव याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

रेल्वेकडून शेतकऱ्यांना गुठ्यांला साडेपाच लाखाचा मोबादला : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या भूसंपादन लढ्यास यश आले आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, सयापूर, पार्ले, हजारमाची, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळावा, यासाठी आंदोलन केले. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेल्वेकडून गुंठ्याला साडेपाच लाखांचा मोबदला देण्यात येत आहे. हा आंदोलनाचाच विजय आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिली. तालुक्यातील बाबरमाची येथील … Read more

मलकापूरात प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर मलकापूर नगर पालिकेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मलकापूर शहरातील दुकानांची पालिकेच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने पाच दुकानांवर केली दंडात्मक कारवाई केलेली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापरास बंदी घालण्यात आली आहे. पालिकेने याबाबत वारंवारं व्यावसायिकांना याबाबतची माहिती देवून कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यावर … Read more