खंडोबाची यात्रा रद्द : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या “या” गावात संचारबंदीचे आदेश

Khandoba Pali

उंब्रज | महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची शनिवार दि. 15 जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत … Read more

कराड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध, आठसाठी रणागंण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या असून, 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आठ ग्रामपंचायतीच्या जागा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका … Read more

सुपनेतील कोयना नदीवरील पाणी पुरवठा संस्थेतील चार सदस्य अपात्र

कराड | सुपने (ता.कराड) येथील कोयना नदीवरील समृद्धी सहकारी पाणी पुरवठा मंडळी लि. सुपने या संस्‍थेची पंचवार्षिक निवडणूक दोन वर्षापूर्वी बिनविरोध झाली होती. यामध्ये एकूण 13 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तथापि, बिनविरोध निवडून आलेल्‍या सदस्‍यांपैकी एकूण 4 सदस्‍यांना संस्‍थेच्या कमांड एरियामध्ये जमीन नसल्‍याची तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेवून जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, … Read more

यंदा 21 वे वर्ष : घारेवाडीत सात जानेवारीपासून बलशाली युवा हदय संमेलन

कराड | शिवमं प्रतिष्ठानच्यावतीने यंदा बलशाली युवा हदय संमेलनाचे दि. 7 ते दि. 9 जानेवारी दरम्यान घारेवाडीत आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रख्यात वक्त्यांच्या व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली. बलशाली युवा हंदय संमेलनाचे यंदा 21 वे वर्ष आहे. त्याचे … Read more

ग्रामपंचायत पोटनिवडणूक : कोळे, अकाईचीवाडीत उंडाळकर तर तुळसणला भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये कराड दक्षिणेत तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचा समावेश आहे. तीनपैकी दोन ठिकाणी उंडाळकर गट तर एका ठिकाणी भोसले गटाला विजय मिळाला. तर कराड उत्तरेत दोन ग्रामपंचायतीची पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाला. कोळेत पोटनिवडणुकीतील विजयाने एकहाती उंडाळकर गटाची सत्ता कोळे येथे अतुल भोसले गटाकडून निवडूण आलेले … Read more

निवडणुकांवर बहिष्कार : गोवारे ग्रामस्थांचा रस्त्यांच्या मागणीसाठी नवा पवित्रा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गोवारे गावास जोडणारे रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत गोवारे ग्रामस्थांचा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान सभेच्या निवडणूकांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आज दि. 8 डिसेंबर रोजी प्रातांधिकारी आणि तहसिलदार कार्यालयाला देण्यात आले. नायब तहसिलदार आनंदराव देवकर यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्विकारले. निवेदनात … Read more

कराड तालुक्यातील बिबट्याच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?? चला जाणून घेऊया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या अनेक दिवसांपासून कराड तालुक्यात बिबट्याचा वावर आहे. मध्यंतरी कराड तालुक्यातील येणके गावाजवळ ऊसतोड सुरू असताना बिबट्याने पाच वर्षीय मुलावर हल्ला केला. त्याला जवळच्या शिवारात अर्धा किलोमीटर दूर उचलून नेऊन ठार मारले. मात्र, त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून बिबट्याला पकडलेली. मात्र, आता अजून एक बिबट्याचे पिल्लू पकडल्याचा व्हिडियो सध्या … Read more

झोपड्या पाण्यात : अवकाळी पावसाचा ऊसतोड मजूरांना फटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल सकाळपासून जोरदार हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा ऊसतोडणी मजूरांना बसलेला आहे. जिल्ह्यातील गावा- गावात ऊसतोडणीचा हंगाम चालू असल्याने मजूरांनी उभारलेल्या झोपड्यामध्ये पाणी शिरले आहे. ऊसतोड मंजूरांना पावसाच्या पाण्यामुळे रात्र जागून काढावी लागली तर संसार उपयोगी साहित्यालाही फटका बसला आहे. सातारा … Read more

जय शिवराय ! किल्ले वसंतगडावर चुन्याचा घाणा 350 वर्षानंतर सुरू

कराड | छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वसंतगडावरील ऐतिहासिक चुन्याचा घाणा तब्बल 350 वर्षानंतर सुरू झाला. किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी रविवारी घाण्याला बैलजोडी जुंपून हा घाणा सुरू करत बांधकाम साहित्याची मळणी करण्यात आली. त्यामुळे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला. कराड जवळील किल्ले … Read more

संपाला गालबोट : सुर्ली घाटात आटपाडी- कराड बसवर दगडफेक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना राज्यात अनेक ठिकाणी लालपरी सुरू झाली आहे. आटपाडी ते कराड बसवर सुर्ली घाटात (ता. कराड) अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीने कर्मचाऱ्यांच्या संपाला पहिल्यांदा गालबोट लागले आहे. याप्रकरणी बस कराड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणली होती. अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. … Read more