कराडात मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी टळली

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी दरवर्षी पावसाळा जवळ आला कि शहरातील धोकादायक व जीर्ण अशा असणाऱ्या इमारती कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटना घडतात. यंदाही अशा स्वरूपाच्या घटना कराड शहरात घडू लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कराड शहरातील लाहोटी कन्या शाळेनजीक असलेल्या दत्त मेडिकल येथील बागवानवाडा नावाच्या जुन्या इमारतीचा काही भाग गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर आंबे घेऊन जाणारा ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी

कराड : तोतापुरी आंबे घेऊन निघालेल्या मालट्रकचा सोमवारी पहाटे पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक कराड येथील कोल्हापूर नाका येथील उधाणपुलानजीक पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चालकासह एकास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले … Read more

कराडचा डंका : माझी वसुंधरा अभियानातही दुसरा क्रमांक

Mazhi Vasundhara

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी। माझी वसुंधरा’ अभियान स्पर्धेत कराड नगरपरिषदेचा दुसरा क्रमांक आला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचत्य साधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, पर्यावरण मंत्री यांच्या उपस्थित ऑनलाईन सन्मान सोहळा पार पडला. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ 2 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या … Read more

कराड शहरात मुसळधार पाऊस; कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने काही काळ कर्मचार्‍यांची तारांबळ

कराड : मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी कराड शहरात झालेल्या मुसळधार पाऊसाने नागरिकांची पळापळ केली. कराड व मलकापूर शहरातील गटारे नगरपालिकांनी स्वच्छ न केल्याने तुडुंब भरून वाहत होती. मान्सून येण्याअगोदरच मान्सूनपूर्व पावसाने नगरपालिकांची लक्तरे वेशीवर टांगली. तर शहरातील कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाऊसाचे पाणी शिरल्याने काही काळासाठी कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. कराड शहरात … Read more

डेड बॉडी आणायला चाललेल्या अँब्युलन्सला पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; कारखान्याच्या ट्रेक्टरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा ताबा सुटला

कराड | डेड बॉडी आणायला निघालेल्या अँब्युलन्सला पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला आहे. कराड शहरातील नटराज टॉकीजच्या समोर मंगळवारी संध्याकाळी ५:३० च्या दरम्यान हा अपघात झाला असून यामध्ये ऍम्ब्युलन्स ड्राइव्हर किरकोळ जखमी झाला आहे. महामार्गावर कारखान्याच्या ट्रेक्टॉरमधून पडलेल्या मळीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या … Read more

सातारा : 1 जूनपर्यंत आणखीन कडक निर्बंध लागू…किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे बंद राहणार, जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

सातारा दि. 22 (जिमाका) :  कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश … Read more

मी दारु पित असताना तू टेरेसवर का आला म्हणत तरुणाचा शेजार्‍यावर जीवघेणा चाकू हल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाने दारूच्या नशेत एकाच्या पोटावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री १०:३०च्या सुमारास कराड शहरातील मंगळवार पेठेत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राजाराम पाटील (रा.मंगळवार पेठ कराड) असे गुन्हा दाखल करण्यात … Read more

कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस महिला डाॅक्टरला रंगेहाथ अटक; 2 वर्षांपासून करत होते व्यवसाय

कराड : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता बोगस डाॅक्टरांच्या घटनाही घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एका महिला बोगस डाॅक्टरला आज पोलिसांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ पकडले आहे. कराड पोलिसांनी सदर बोगस महिला डाॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिस उपनिरिक्षक राजू डांगे यांनी दिली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1921751107984719 … Read more

मासे पकडण्यासाठी गळ टाकला अन् हातात आला बाँम्ब; ATS पथक घटनास्थळी दाखल

कराड : तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/172021018171282 कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच … Read more

RSS च्या स्वयंसेवकांनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये; पालकमंत्री पाटीलांचा नाव न घेता संघावर निशाणा

कराड : शासकिय रुग्णालयात लसीकरण मोहिमेवेळी गणवेश परिधान करुन सेवा बजावणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर युवक काँग्रेसने 10 मे रोजी आक्षेप घेतला होता. तसेच रा.स्व.से. च्या स्वयंसेवकांकडून गणवेश परिधान करुन पोलिटीकल अजेंडा राबवण्याचे काम केले जात आहे असा आरोप केला होता. आता यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही उडी घेतली आहे. शासकिय रुग्णालयात कोणत्याही संघटनेच्या … Read more