प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद

Pritisangam Ghat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणूमुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कराड शहरातील पर्यटन स्थळांवर नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे बंद शनिवारपासून बंद करण्यात आली आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील स्व. पी.डी. पाटील उद्यान, प्रितीसंगम उद्यान, टाऊन हॉल्न, … Read more

पोलिस अधिक्षक बन्सल यांच्याकडून स. पोलिस निरिक्षक पदाच्या तीन अधिकार्‍यांच्या बदल्या

Ajaykumar Bansal Satara Police

सातारा | पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शनिवारी रात्री उशिरा पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोणंद, पुसेगाव, सातारा शहर, रहिमतपूर अन् कराड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांची पदोन्नती झाली असली तरी त्यांना सोडण्यात आले नसल्याने त्यांची नियंत्रण कक्षाला … Read more

वृध्दाश्रमातील 19 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण

Satara Corona News

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृध्दाश्रमातील 19 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. यातील चार लोक लक्षणं रहित तर उर्वरित 15 लोक लक्षण विरहीत (असिम्टोमॅटिक) असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय पथकाने या ठिकाणी ठिय्या दिला असून संबंधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी … Read more

अर्थसंकल्पातील मोफत बस सेवा सातारा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षापासून सुरू; मुलींसाठी मोफत बससेवेचा मलकापूर पॅटर्न राज्यभर

Malkapur News

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली बारावी पर्यंतच्या मुलींना मोफत बस सेवा ही सातारा जिल्ह्याच्या मलकापूरमध्ये गेली ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मलकापूर पॅटर्न राज्यानं स्वीकारल्याचा आनंदोत्सव नागरिकांनी साजरा केला. मलकापूर (ता.कराड,जि. सातारा) येथे गेली ९ वर्षांपासून शालेय मुलींना मोफत प्रवास हा उपक्रम सुरू आहे. मलकापूरचा पॅटर्न राज्यानं आता स्वीकारला आहे. मलकापूर … Read more

कराड : कृष्णा नदीवरील नवीन रेठरे पुलाच्या कामाला 45 कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर

New Rethare Bridge

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बु. येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला काल झालेल्या राज्य अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. रेठरे येथील कृष्णा नदीवरील पूल दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गाला व रेठरे बुद्रुक मार्गे सांगली जिल्ह्याला जोडणारा दुवा आहे. सध्या … Read more

कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर; पाटणला 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाकरिता नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्वाच्या मोठ्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता … Read more

पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरांच्या कॅबिनमध्येच एकावर चाकू हल्ला; कराड शहरातील घटनेने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनात एकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. बी. आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले. व जखमीस उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. किशोर पांडुरंग शिखरे (वय 30, रा. हजारमाची, ता. कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर लखन भागवत माने … Read more

कराड नगरपालिका : 134 कोटी 79 लाखांचा अर्थसंकल्प उपसूचना घेवून बहुमताने मंजूर; जनशक्ती अन् भाजपमध्ये गदारोळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगपरिषदेचे 2021- 2022 सालातील 134 कोटी 79 लाख 20 हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीने सूचविलेल्या उपसूचना स्विकारून अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील सूचना मांडल्यानंतर सभागृहात जनशक्ती, भाजप यांच्यात गदारोळ मांडला होता. नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर आजची … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात सापडले 130 नवीन कोरोनाग्रस्त; विद्यार्थीही कोरोनाग्रस्त आढळत असल्याने पालकांच्यात चिंता

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्याय कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 130 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा अता 58 हजार 499 वर पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती पुढे आली आहे. या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा हाहाकार! 201 नवीन रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 96 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 507 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तसेच जिल्ह्यात आज दिवसभरात 201 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत. जिल्हा रुग्णालय सातारा येथील … Read more