हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. आज कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. यावेळी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने एकत्रित येत घोषणाबाजी केली जात आहे. यावेळी भाजप नेते यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. “या राज्यात सरकार आहे की नाही? या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे,” अशी टीका सोमय्या यांनी केली.
भाजपनेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. या राज्यात सरकार आहे की नाही? सरकार आझाद मैदानावर येत नाही आणि कामगार भगिनी भेटायला येत आहे तर त्यांना भेटूही देत नाही. या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे. या सरकारचे करायचे काय? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
एकीकडे आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे म्हणून संप केला जात आहे. तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांची बैठक सुरु आहे. अशात कर्मचाऱ्यांनी अजूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हजारो एसटी कामगार आझाद मैदानात येऊन थांबले आहेत.