कोल्हापूरात वैद्यकीय सेवेतील सर्वांना मिळणार ‘कॉटन मास्क’

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्हयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स आदी सर्वांना मास्क देणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमधील कोरोना स्वतंत्र कक्षाला खासदार माने यांनी भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱया वैद्यकीय सेवा व सुविधांचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते. मास्कच्या उपलब्धतेसाठी इचलकरंजीतील गारमेंट … Read more

जिल्ह्यात परदेश दौऱ्यावरून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन करून घ्यावे- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश तसेच जिल्ह्याबाहेरुन प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी स्वत: आरोग्य तपासणी करून 14 दिवस घरीच स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या … Read more

कोल्हापूरच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्ह्यामध्ये अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकचा गॅस यांचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पेट्रोलियम कंपन्या तसेच बाजार समितीचे व्यापारी यांच्या सोबत बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

करोना इफेक्ट: अंबाबाई मंदिर प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने साडे तीन शक्ती पीठांपैकी महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर प्रवेशद्वार मध्यरात्री पासून बंद करण्यात आलय. अंबाबाईची आरती झाल्यानंतर मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आज सकाळपासून अंबाबाई मंदिर परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. मोजके पुजारी आणि … Read more

कोल्हापूर शहरातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. याठिकाणी मंगल कार्यालय, … Read more

करोनामुळं कोल्हापूरात मनपाची उद्याने 31 मार्च पर्यंत बंद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महानगरपालिकेची सर्व उद्याने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज (दि.16) महापालिका प्रशासनाने घेतला. सध्या भारतामध्ये आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून याबाबत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालये आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजार … Read more

माती उत्खननप्रकरणी २३ शेतकऱ्यांना तब्बल ४ कोटींच्या दंडाची नोटीस

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथल्या विविध शेती गट नंबरमध्ये परवान्यापेक्षा ९ हजार ८९५ ब्रास जादा माती उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरोळ तहसील विभागाने शेडशाळ येथील १० शेतकरी तसेच अंकली, हरिपूर येथील वीटभट्टी व्यावसायिक अशा २३ जणांना ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. … Read more

राधानगरी अभयारण्यात भीषण आग ; आग विझवण्यासाठी तरुणाईचे शर्थीचे प्रयत्न

राधानगरी जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी तरूणाई शर्थीचे प्रयत्न करत आहे?

कोल्हापूरात उसाच्या फडाला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

ऊसाच्या फडात लागलेल्या आगीने एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.

अंबाबाई मंदिरात कोरोना व्हायरसची दक्षता ; पर्यटक भाविकांसाठी स्टेरेलीयम लिक्विडचा वापर

अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कोरोनव्हायरसपासून बचावासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.