कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

Vedanta Vasant Chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ओझर्डे (ता. वाई) येथील कृष्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेला शिरगावमधील वेदांत वसंत चव्हाण (वय16) हा युवक बुडल्याची घटना रविवारी घडली. या घटनेनंतर सायंकाळी उशिरापर्यत महाबळेश्वर ट्रेकर्सकडून नदीपात्रात युवकाचा शोध घेतला जात होता. मात्र, काहीच हाती आले नसल्याने सायंकाळी उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली. याबाबत घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

कृष्णानदी प्रदूषणा विरोधात सायकलपट्टू दत्ता पाटील यांचे अन्न त्याग आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीच्या पाचवीला पुजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. शेरीनाल्याच्या बंधार्‍याजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळण्याचे थांबत नाही. एकीकडे प्रशासनाकडून कृष्णा माई स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात प्रदूषण … Read more

कृष्णेच्या नदीपात्रात 12 फूट मगरीच्या दर्शनाने कृष्णाकाठ धास्तावला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या पोटमळीमध्ये पडलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरामध्ये शेतीला पाणी देणाऱ्या तब्बल बाराहून अधिक मोटारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोटारीच्या कामासाठी सातत्याने ये-जा करावी लागते. परंतु, … Read more

कृष्णा नदीला पूर : अवकाळी पावसाचा कहर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पुलावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलावर आलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातून लोक गर्दी करू लागले आहेत. तसेच जिहे कठापूर – कोरेगाव या मार्गावर पुलावर पाणी आल्याने वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. … Read more

घातपाताचा संशय : कृष्णा नदीपात्रात मच्छिमारांना सापडला पोत्यात मृतदेह

Crime D

कराड | कराड तालुक्यातील मालखेड येथे मारकडेश्वर घाट परिसरात बुधवारी दि. 17 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास पोत्यात बांधलेला पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. कृष्णा नदीपात्रात पोत्यातील मृतदेह मच्छिमारांना आढळून आला. मालखेड येथील कृष्णा नदीत दोन ते तीन पोत्यात बांधून मृतदेह नदीत टाकला असा संशय व्यक्त करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम … Read more

टेंभू येथे कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील टेंभू येथील कृष्णा नदीच्या पात्रात स्थानिकांना मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी नदीकाठावर जाताना दक्षता घ्यावी, नदीकाठी जाण्याचे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. टेंभू येथील कृष्णा नदीच्या पात्रात काही ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले. त्यामधील काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये मगरीचे चित्रीकरण केले. हा … Read more

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर नविन पूलासाठी 45 कोटी तर जुन्या पूलासाठी 6 कोटी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर 45 कोटी रुपये खर्चाचा नवीन उभारला जाणार असून जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण 51 कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होऊन त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. नवीन … Read more

आटकेसह कराड शहरातील वाखाण परिसरात कृष्णा नदीकाठी 10 फूट लांब मगरीचे दर्शन

मगर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात वाखाण परिसरात कृष्णा नदीकाठावर मंगळवारी 10 रोजी दुपारी 8 ते 10 फूटाच्या मगरीचे दर्शन झाले. तर आटके परिसरातील पाचवड मळी नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी गावातील एका शेतकर्‍याला मगरीचे दर्शन झाले आहे. कराड शहरासह दोन ठिकाणी मगर पहावयास मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कराड शहरातील वाखाण परिसरातील सुहास … Read more

मालखेड येथे नदीकाठावर मगरीचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापुर आला होता. सध्या पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने महापूराचे पाणी ओसरु लागले आहे. नदीकाठी पाण्याखाली गेलेल्या शेत जमिनी दिसून लागल्या आहेत. कराड तालुक्यातील मालखेड येथे मंगळवारी सकाळी कृष्णा नदीपात्रालगत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या लोकांना मगर आढळून आली. सुमारे दहा ते बारा फुट लांबाची मगर … Read more