तरी चीनकडून मोदींचं कौतुक का? राहुल गांधींचा संतप्त सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये चीननं घोसखोरीचं केली नसल्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षांचा तिखट सूर मावळत नाही, तोच गांधी यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित करत सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ … Read more

अखेर चीननं गलवान खोऱ्यात आपले सैनिक मारले गेल्याचं केलं मान्य

बीजिंग । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं कबूल केलं आहे. चीनने आपले २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचं सांगितलं आहे. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यातील संघर्षात ठार झालेल्या १६ चिनी जवानांचे मृतदेह चीनकडे सोपवले असल्याचं वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली आहे. … Read more

धक्कादायक! गलवान संघर्षात चिनी सैन्याने धारदार शस्त्रांनी भारतीय जवानांवर केला होता वार

नवी दिल्ली । लष्करातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली १५-१६ जूनच्या रात्री चीनच्या सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी दोन्ही सैन्यात अतिशय हिंसक स्वरूपाची ही झडप झाली होती. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार या संघर्षामध्ये भारतीय जवानांना बऱ्याच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी … Read more

भारत चीन युद्धजन्य परिस्थितीवर रामदेव बाबांचे मोठे विधान; म्हणाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 सैनिक शहीद झाले त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे,बाबा रामदेव यांनी सरकारकडे आता आपण … Read more

मोदींच्या ‘त्या’ विधानावर पंतप्रधान कार्यालयाची सारवासारव; म्हणाले…

नवी दिल्ली । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदींच्या या दाव्यानंतर … Read more

कोण आहे ‘ती’ चिनी महिला? जिने नेपाळला नवा नकाशा बनवण्यासाठी भडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या वादग्रस्त राजकीय नकाशाला मान्यता दिली. यानंतर नेपाळने उत्तराखंडमध्ये भारताच्या सीमेवर सशस्त्र जवान तैनात केले आहेत. या नव्या नकाशामध्ये नेपाळ भारतातील तीन क्षेत्रांना आपले असल्याचे सांगत आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधूरा हे भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहेत. असा विश्वास आहे की भारताच्या या क्षेत्रांना आपले सांगण्याचे काम नेपाळने … Read more

गलवान झडप: चीननं बंदी केलेल्या १० भारतीय सैनिकांची सुटका

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री लडाखमधील गलवाल येथे चीनी सैन्याने हल्ला केल्यानंतर १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात होते. मात्र, चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनंतर या सैनिकांना गुरुवारी सोडून देण्यात आले. या १० जवानांमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे या ३ पक्षांना निमंत्रणच नाही

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदी घेणार आज सर्वपक्षिय बैठक

नवी दिल्ली । चीनसोबत सध्या चालू असलेला वाद आणि चीनबाबत सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. तप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more