विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वनविभागाकडून जीवदान ; पिंजरा सोडून केली सुटका

Forest Department Rescues Leopard

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोळे येथे एक बिबट्याचे पिल्लू मंगळवारी विहिरीत पडले होते. त्या पिल्लाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याची घटना बुधवारी घडली. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटकाही केली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कोळे येथील जयवंत बाबुराव माळी यांच्या मालकीच्या विहिरीत मंगळवारी रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बिबट्याचे पिल्लू … Read more

Video : भोळेवाडीतील बिबट्याच्या पिल्लांना मादीने अखेर 3 दिवसानंतर नेले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भोळेवाडी (ता.कराड) येथील शिवारात शनिवार दि. 16 रोजी ऊसतोड सुरु असताना तोडणी कामगारांना अंदाजे 25 ते 30 दिवस वयाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. कराड वनविभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ … Read more

ऊसाच्या फडात सापडली बिबट्याची दोन पिल्ले

Karad Leopard Cubs

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरु आहे. कराड तालुक्यातील भोळेवाडी येथील शेत शिवारात ऊस तोड सुरु असताना दोन बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची घटना आज दुपारी घडली. यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यात विंग परिसरात बिबत्याचा मुक्तपणे संचार असल्याने … Read more

मेंढपाळांच्या घोड्यांवर बिबट्याचा हल्ला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग कणसे मळा येथे बिबट्याने मेंढपाळाच्या कल्पनांवर तसेच घोड्यावर अचानक हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला तर शिंगरू गंभीर जखमी झाले होते. त्या शिंगरुचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून तसेच वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी कराड तालुक्यातील विंग येथील कणसे मळा या ठिकाणी … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : मस्करवाडीत वैरण काढताना बिबट्या व बछडा शेतात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज भागात असलेल्या मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी कराड येथे काॅटेज हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेतात कडबा कापताना मादीने हल्ला केला आहे, बिबट्या मादीसोबत एक बिबट्याचे पिल्लू (बछडा) असल्याने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; महिला जखमी

औरंगाबाद – धावत्या मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव रस्त्यावर घडली. मीना परशुराम मुठ्ठे (वय 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, सदर महिला ही कापूसवाडगाव येथील रहिवासी आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मीना मुठ्ठे पति परशुराम मुठ्ठे … Read more

वन्यप्राणी बिबट्याला कुत्र्यांनी शेताकडेला आणून खाल्ले

 कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील बाजे- रासाटी येथे मालकी क्षेत्रात वन्यप्राणी बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अंदाजे 10 ते15 दिवस जुने सडलेल्या अवस्थेत बिबट्याचे शव मिळून आला आहे. सदर सडलेले मृत बिबट्यास भटक्या कुत्र्यांनी शेताकडेला आणून खाल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी दि. 16 रोजी मौजे बाजे- रासाटी येथे … Read more

बिबट्या फासकीत : डाॅग स्काॅडच्या मदतीने आरोपीला अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील खोडशी येथील कृष्णा नदीकाठी लावलेल्या फासामध्ये बिबट्या अडकल्याची घटना काल मंगळवारी दि. 9 रोजी पहाटे 5 वाजता उघडकीस आली. नदीकाठी फासकी लावणाऱ्या संशयितास वनविभागने ताब्यात घेतले आहे. बाबू सखाराम जाधव (वय ४५, सध्या रा. खोडशी, कायम राहणार गोपाळनगर कार्वे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. वनविभागाने दिलेली माहिती … Read more

बिबट्याची आता इस्लामपुर मध्ये ‘एन्ट्री’, शहरातील उपनगरांमध्ये दहशतीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील डोंगर परिसरात निदर्शनास येणारा बिबट्या सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास इस्लामपूर शहरातील जिजाईनगर परिसरात दाखल झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. शहराच्या उपनगरातील वस्तीवरील नागरिकांनी रात्रीच्या वेळी दक्षता घेेण्याच्या सूचना वन विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. इस्लामपूर शहराच्या जिजाऊनगर येथे अभिनंदन पाटील कुुटुंबीयांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास असून शेजारीच त्यांच्या घराचे बांधकाम … Read more