नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे … Read more

पुण्यात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा कोरोनामुळं मृत्यू; प्रशासन संपर्कात आलेल्यांच्या शोधात

पुणे । येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांसह येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झोप उडाली असून संबंधित युवकाने किती जणांना दारू विक्री केली याची माहिती मिळणे अवघड झालं आहे. दरम्यान, या युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला … Read more

गर्दी करू नका! आता दारू खरेदीसाठी मिळणार टोकन

मुंबई । राज्यात दारू विक्रीची दुकान सुरु करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी तळीरामांची एकच झुंबड उडाली आहे. ४० दिवसांनंतर दारू मिळणार असल्यामुळे तळीरामांनी सकाळपासूनच वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या सर्वात दारुच्या दुकानांसमोरील प्रचंड गर्दी टाळण्याचा प्रश्न सरकार निर्माण झाला होता. त्यावरही सरकारनं मार्ग … Read more

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

नाशिक प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा … Read more

मुक्तांगण बंद होईल का ?

विचार तर कराल | मुक्ता पुणतांबेकर पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून १९८६ साली माझे आई – बाबा डॉ. अनिता अवचट व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण ची स्थापना केली. त्यावेळी उद्घाटनाच्या भाषणात पु. ल. म्हणाले होते, ” आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करतोय या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देणार … Read more

केरळमधील तळीरामांना दिलासा; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणार दारू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्रानं संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली … Read more

चंदगड तालुक्यात उत्पादन शुल्क पथकाच्या छाप्यात लाखो रूपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील नांदवडे येथे छापा टाकला. या छाप्यातलाख 31 हजार 600 रूपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून संतोष रामाण्णा गावडे (वय 25, रा. चव्हाण गल्ली,नांदवडे) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा भरारी पथकामार्फत काल आजरा चंदगड परिसरातील संशयित ठिकाणी अवैद्य … Read more

‘या’ राज्यात खुलणार केवळ महिलांसाठी दारूचे अड्डे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा महिला दारूच्या दुकानात दारू विकत घेण्यासाठी लाजतात. असं होणं साहजिक आहे, कारण एखादी महिला दारू खरेदी करायला गेल्यास तिच्या आजूबाजूचे लोक, तसेच दुकानदारसुद्धा तिला अशा नजरेनं पाहतात की ज्यामुळं तिच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. मात्र, मध्य प्रदेश सरकारने दुकानातून दारू खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी एक नवा मार्ग शोधला आहे. … Read more

कर्नाटकमधील गरीब मद्यपींसाठी आनंदाची बातमी, ब्रँडेड दारूवर मिळणार सरकारी अनुदान

गरीब लोक कमी दर्जाची दारू पिण्यापासून रोखण्यासाठी काही दारूच्या ब्रँडवर अनुदान देण्याचा विचार कर्नाटकच्या उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलत आहे. याशिवाय सरकारकडून राज्यात बार आणि रेस्टॉरंट रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. काँग्रेस-जेडीएस आघाडीतून बाहेर पडून भाजपमध्ये आलेले अपक्ष आमदार एच नागेश यांच्याकडे महत्वाचे खाते मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दिलं आहे. ते हा निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे.