लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. … Read more

Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा … Read more

ममता दीदींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये १ जूनपासून धार्मिक स्थळं होणार खुली

कोलकाता । येत्या 31 मे रोजी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, देशातील कोरोनाग्रस्तांचे वाढत प्रमाण पाहता लॉकडाऊन आणखी काही आठवडे वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपासून सर्व धार्मिक स्थळं खुली केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. … Read more

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा … Read more

केंद्राकडून देशातील ‘ही’ १२ शहरे सोडून इतर भागातील लॉकडाउन उठवला जाऊ शकतो

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून लवकरच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सरकारने नेमलेल्या दोन समित्यांनी यापूर्वीच ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नये, अशी शिफारस सरकारला आहे. त्यामुळे केंद्राकडून देशातील १२ शहरे सोडून इतर ठिकाणचे निर्बंध उठवण्यात येणार असल्याचे कळते. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. परिस्थिती पाहून … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

चिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य रेषेखाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे पंतप्रधान ली किंग यांनी गुरुवारी सांगितले की,’ त्यांच्या देशात ६० दशलक्षाहून अधिक गरीब लोक असून त्यांचे मासिक उत्पन्न हे फक्त एक हजार युआन म्हणजेच सुमारे १४० डॉलर्स इतके आहे आहे. ते म्हणाले की,’ कोरोना विषाणूच्या साथीने या लोकांची अवस्था अधिकच खराब झाली आहे. वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना ली म्हणाले, … Read more

संभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल 

सांगली प्रतिनिधी । देश कोरोनासारख्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीच्या नियमांचे पाल केले जात आहे. संक्रमण साखळी तोडून लवकरात लवकर सामान्य माणसाला त्यांचं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून सरकार काटेकोरपणे काही गोष्टी पाळत आहे. मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी या संचारबंदीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातून बाहेर जात असताना … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more