कोरोना रुग्णांच्या आयसोलेश वाॅर्डमध्ये कन्स्ट्रक्शन काम; नितेश राणेंनी शेयर केला व्हिडिओ

सिंधुदुर्ग । कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी झाले आहे. असा डंका राणे कुटुंबीयांनी सुरु ठेवला आहे. त्यासंदर्भात ते सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून विविध पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राणे बंधूनी केईएम रुग्णालयातील मृतदेह तसेच एका रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्न याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केले होते. आता पुन्हा एकदा नितेश … Read more

शाळा सुरु कधी होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीही मैदानात; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली उत्पादन भारतभरात प्रसिद्ध आहे. विविध आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचे अनेक उपाय प्रसिद्ध आहेत. ते सतत विविध कार्यक्रमातून, शिबिरातून योगमहत्व सांगत असतात. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना रामदेव बाबा हे विविध वाहिन्यांवर लोकांना संचारबंदीचा सदुपयोग करीत योगाभ्यास करा, नियमित योग करा असा संदेश देताना दिसत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम … Read more

सेक्रेड गेममधील ‘या’ अभिनेत्रीकडे मोलकरणीला द्यायलाही पैसे उरले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लादलेल्या संचारबंदीमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. गरीब, मध्यमवर्गीय लोकांसोबत आता फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीवर आर्थिक संकट आल्याच्या बातम्या आहेत. सेक्रेड गेममधील अभिनेत्री एलनाज नौरोजी सध्या आर्थिक संकटात आहे. ती साध्य जर्मनीत आहे. भारतापेक्षा जास्त बिकट स्थिती असल्याने जर्मनीतील स्थिती खराब आहे. अशा परिस्थितीत हाताला कोणतेच … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले..

मुंबई । देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. येत्या २९ तारखेला आम्ही राज्यातील लॉकडाऊनच्या … Read more

लॉकडाऊनचा ५ वा टप्पा लागू होणार का? केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई । देशात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही प्रसार माध्यम संस्थांकडून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रसार माध्यमातून केले जाणारे लॉकडाऊन ५.० बद्दलचे … Read more

लॉकडाऊनचा नियम मोडू नये, म्हणून ‘या’ देशाचे पंतप्रधान आपल्या मरणासन्न आईला भेटू शकले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी जगभरातील सर्व नेत्यांसाठी एक उदाहरण ठेवले आहे. ज्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा होते आहे. पीएम मार्क यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती आणि त्या जगणे शक्य नसल्याचे त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे देशात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे मार्क यांना शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांच्या आईला भेटता आले … Read more

लॉकडाऊनमध्ये प्रियकर पंजाबी ड्रेस घालून निघाला प्रेयसीला भेटायला, पण..

वलसाड, गुजरात । लॉकडाउनमुळे प्रियकर-प्रेयसींना विरह सहन करावा लागत आहे. त्यांचा संवाद फक्त मोबाइलपुरता उरला आहे. बरेच जण घरी असल्यानं घरच्यांसमोर फोनवर सुखानं बोलताही येत नाही. लॉकडाऊन हा अनेकांसाठी न संपणारा वनवास ठरतं आहे. दरम्यान, काही प्रियकर-प्रेयसींच्या मनात लॉकडाऊनचे नियम मोडत आपल्या जिवलगाला भेटण्याची उत्कट इच्छा तयार होत आहे. रस्त्यावरील पोलीस आणि कोरोना यामुळं काहींनी … Read more

शाळा, कॉलेज उघडण्याबाबत गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने … Read more

मोठी बातमी! टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्व उच्चधिकाऱ्यांची आज टेलीकॉन्फरन्स वर मिटिंग झाली आहे. या मीटिंगमध्ये यावर्षी होणारा टी -२० विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र असणाऱ्या कोरोनाच्या वातावरणामुळे जर या निर्णयाचे औपचारिकरण झाले तर येत्या काही महिन्यात सभासदांना त्यांची ब्लु प्रिंट पाठवता येणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये विश्वचषक २०२२ मध्ये जाण्याची मोठ्या … Read more