कोरोनाच्या संकटकाळात वडी गावच्या महिला सांभाळत आहेत कायदा सुव्यवस्था, घेत आहेत आरोग्याची काळजी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे महिलांनी मनात आणले तर त्या गाव कारभार अत्यंत शिस्तीने कशा पध्दतीने करू शकतात याचे ताजे उदाहरण कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन चालू असलेल्या लॉक डाऊन मध्ये पाथरी तालूक्यातील वडी गावात पहायला मिळत आहे. गावाचा कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस पाटील, कोतवाल, ही पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त असल्याने ही जबाबदारी … Read more

मजुरांच्या रेल्वे तिकीट खर्चाविषयी निर्णय घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई । लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयी निर्णय घेण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. ‘सर्व हारा जन आंदोलन’ या स्वयंसेवी संस्थेसह अन्य काहींनी केलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयीच्या जनहित याचिकांवर न्या. गुप्ते यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटाच्या खर्चाविषयी लवकर … Read more

प्रवीण परदेशी यांची मुंबई पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी; इक्बाल चहल सूत्र घेणार हाती

मुंबई । मुंबईत कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाच राज्य सरकारने मुंबई पालिकेचं व्यवस्थापन सांभाळत असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असताना प्रशासनात कोणताही गोधळ असू नये म्हणून राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यात पहिला दणका मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आला आहे. परदेशी यांच्या जागी मुंबई … Read more

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची … Read more

CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या रखडलेल्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज शुक्रवारी ८ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी या परीक्षांच्या वेळापत्रबाबत माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं  CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबतची घोषणा करणारा डॉ. … Read more

येत्या १० दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली । देशभरातील सार्वजनिक वाहतुक सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या १० दिवसात देशभरातील सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, बंद असलेली … Read more

लॉकडाऊन ३१ मेपर्यंत लांबणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई । राज्यातील कोप्रादुर्भाव वाढतच असून तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द- उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या निर्देशांनुसार … Read more

औरंगाबाद येथील ‘त्या’ अपघाताला कोण जबाबदार? प्रत्यक्षदर्शनी घटना पाहिलेला कामगार म्हणतो…

औरंगाबाद प्रतिनिधि | जालना येथील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे घडली आहे. या कामगारांनी आठवडा भरापुर्वीच गावी जाण्यासाठी पासची मागणी केली होती. मात्र मध्यप्रदेश सरकारने आठवडाभर दखल न घेतल्याने कामगारांवर मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे या अपघात किरकोळ जखमी असलेल्या मजुरांकडून मध्यप्रदेश सरकारच्या दिरंगाईवर ठेवण्यात आले आहे. … Read more

कामगारांना आहे तिथंच ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर; आता जनता अन्याय सहन करणार नाही – राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशभरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादात देशभरात कोरोनाव्हायरस संदर्भातील प्रश्नांवर सुरु असलेल्या चर्चेचा उहापोह राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस प्रस्तावित करत असलेली न्याय योजना तात्काळ लागू करुन देशभरातील गरिबांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करण्याची मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. याशिवाय केंद्र … Read more