लॉकडाउन तरी पेट्रोल, डिझेलचे ‘भाव’ वाढले..

नवी दिल्ली । देशात कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नसताना लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. लॉकडाऊन वाढवला असला तरी परिस्थिती पाहून झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. एकीकडे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांत … Read more

रोहित पवारांनी गर्दी करणाऱ्या तळीरामांना दिला हा मोलाचा ‘सल्ला’

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोल्हापूरमध्ये तर दारू मिळवण्यावरून दोन … Read more

कोविड -१९ दरम्यान टेनिस कोर्टवर जाऊन नोव्हाक जोकोविचने मोडला लॉकडाऊनचा नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोव्हाक जोकोविचने स्पेनमधील टेनिस कोर्टावर जाऊन लॉकडाऊनचा नियम तोडला.जोकोविचने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो मार्बेल्ला शहरातील टेनिस क्लबमध्ये दुसर्‍या माणसाबरोबर टेनिस खेळत आहे.सर्बियाचा जोकोविच सध्या या शहरात राहतो आहे. View this post on Instagram   Que bueno esto punto.. Te gusta correr Carlos? Estoy muy feliz con … Read more

‘देशाला एका मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज’; राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिजीत बॅनर्जींचे उत्तर

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनामुळं उदभवलेल्या अर्थसंकटात सापडला आहे. उद्योग ठप्प आहेत. लॉकडाऊनमुळं रोजंदारी पोट कोट्यवधी जनता बेरोजगार झाली आहे. अशा आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी संवाद साधत आहेत. आज मंगळवारी त्यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी, आज देशाला पैशाची चिंता … Read more

बाहेर अडकलेल्या तब्बल ३ हजार ५५३ नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र शासनाने अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार आता राज्य शासनानेही अडकलेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून, जिल्ह्यातून त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने परराज्य, जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने देण्यात आले आहे. … Read more

टोकियो ऑलिम्पिकमधून शिकून भविष्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचे नियोजन केले पाहिजे – सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी खरे आव्हान म्हणजे कसोटी क्रिकेट हे होय,परंतु याक्षणी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व देशांचे दौरे पुढे ढकलले गेले आहेत आणि त्यामुळे जागतिक कसोटी चँपियनशिपचे भवितव्य मध्यातच अडकले आहे.२०२१ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या जाणार्‍या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडे यावर … Read more

UPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली आहे. ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केला. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध … Read more

औरंगाबादमध्ये एकही दारूचं दुकान उघडू देणार नाही- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । ”जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू” असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारनं रेड झोनमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून दारूची दुकान सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं तळीरामांकडून स्वागत होत असलं तरी, काही ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत … Read more

सातारकरांना दिलासा! कंटेनमेंट झोनमधील गावांना किराणा माल साहित्य घर पोच मिळणार

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सातारा व जावली तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील ओदश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणा मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा व जावली … Read more

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, … Read more