सर्वात मोठी बातमी!! शिवसेनेकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Shivsena candidates list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शिवसेना (Shivsena) पक्षाने देखील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, संजय मंडलीक, हेमंत पाटील, … Read more

माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही; निर्मला सीतारामन स्पष्टच बोलल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजप पक्षाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या 7 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अजून काही मतदारसंघांच्या याद्या या जाहीर होणे बाकी आहेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. माझ्याकडे पैसेच नसल्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी … Read more

राज्यातील 500 डॉक्टरांना लावली जाणार इलेक्शन ड्युटी; रुग्णांचे होणार का हाल?

Election duty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच शिक्षकांबरोबर डॉक्टरांनाही इलेक्शन ड्युटी (Election Duty) लावली जाणार आहे. यामुळे रुग्णांच्या सेवेची पूर्ण जबाबदारी रुग्णालयात काम करणाऱ्या इतर डॉक्टरांवर (Doctor’s) येऊन पडणार आहे. तसेच, यामुळे रुग्णांची गैरसोय देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये डॉक्टरांना देखील अतिरिक्त काम करावे लागेल. मुख्य म्हणजे, यापूर्वी कधीही निवडणुकीच्या … Read more

भाजपची सातवी यादी जाहीर; नवनीत राणांना तिकीट, साताऱ्याचा सस्पेन्स कायम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदा भाजपने अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकिट दिले आहे. तसेच, चित्रदुर्ग येथून गोविंद करजोल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याला नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी … Read more

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजितदादा- शिंदेंसह ‘या’ नेत्यांचा समावेश

BJP Star Campaigners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी (BJP Star Campaigners) जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे. तब्बल ४० जणांची यादी करत भाजपने निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे असं म्हणावं लागेल. … Read more

..तोपर्यंत कोणताच शब्द देता येणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा तो दावा जरांगेंनी फेटाळला

prakash ambedkar, jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष स्वातंत्र्य निवडणूक लढवेल हे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केल्याचा दावा केला … Read more

Ramtek Lok Sabha Election 2024 : कृपाल तुमानेंची भिस्त भाजपवर; काँग्रेसला गड जड जाणार?

ramtek lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग व्यापणारा हा रामटेक लोकसभा मतदारसंघ (Ramtek Lok Sabha Election 2024)… जागतिकीकरणाची दारं ज्या पंतप्रधानांनी खुली केली त्या पी. व्ही. नरसिंहरावांनीही याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं होतं…काँग्रेसच्या पारंपारिक असणाऱ्या मतदारसंघावर 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेचा भगवा फडकत राहिलाय…बाळासाहेबांनी पाय रोवून दिलेल्या रामटेकमध्ये विद्यमान खासदारांनी शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेंना साथ दिली…त्यामुळे … Read more

प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय!! अखेर ‘वंचित’ ची भूमिका जाहीर

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज अपत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. वंचित लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा सहयोग वंचित आघाडीला मिळेल असेही प्रकाश … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

Government Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा सरकारने केली … Read more

लोकसभेसाठी ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर; पहा कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

thackeray group loksbha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) यांच्या शिवसेनेकडून १७ जागांसाठी उमेदवारी यादी (Candidate List 2024 Lok Sabha) जाहीर करण्यात आली आहे . शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर हि नावे जाहीर केली आहेत . यामध्ये सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांची उमेदवारी कायम … Read more