परमबीर सिंह प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; सर्व प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंह प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे सिंह यांना कारवाईपासून संरक्षणही मिळाले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील … Read more

“साखर कारखान्यांना यापुढे हमी दिली जाणार नाही”; अजित पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारकडून अनेक विधेयके, प्रस्तावास मंजुरी दिली जात आहे. आज गोंधळात सुरु झालेल्या अधिवेशनात राज्य सरकारच्यावतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला. वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना यापुढे हमी दिली जाणार नाही, अशी घोषणा केली. आज मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनास गोंधळाच्या वातावरणात … Read more

“उचलली जीभ लावली टाळ्याला…”; पंतप्रधानांवरील टिकेवरून चंद्रकांतदादांचा राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या  कारवायांवरून काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हललाबोल केला. “एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असे राऊत यांनी म्हंटले. … Read more

एसटीचे विलीनीकरण शक्य नाही; मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनिकरणाच्या मागणीसाठी राज्यभर संप करण्यात आला. या विलीनिकरणाच्या मागणीसदर्भात आज मुंबई हाय कोर्टाच्या समितीने महत्वपूर्ण अहवाल दिला. त्यानंतर एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचा शिकामोर्तब करत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधिमंडळात अर्थ सकल्पीय अधिवेशनात आज पर पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीच्या विलीनीकरण संदर्भात निर्णय … Read more

“बदनामीची मोहीम उद्या तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊत यांचा भाजपला इशारा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. “हे शेकडो, हजारो कोटी खर्च करून निवडणुका … Read more

“..तर मी आत्महत्या करणार”; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील महाविकास आघाडीचेअनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड महत्वाचे विधान केले. “माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर … Read more

“निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारकडून जनतेला महागाईचा बुस्टर डोस”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक संपल्या आहेत. निवडणुका संपल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलमध्येही वाढ केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कोरोना महामारीनंतर आधीच आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या जनतेला ‘महागाईचा बुस्टर डोस’ केंद्राकडून दिला जात आहे. उदरनिर्वाहाची कसरत करताना लोकांच्या अक्षरश: … Read more

“थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवयच”; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर … Read more

“आमचे तीन शत्रू आहेत, पहिला काँग्रेस, दुसरा एमआयएम आणि तिसरा…”; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Raosaheb Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यात एमएम पक्षावरून सध्या एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. तर एमआयएम हि भाजपची बी टीम असल्याचा आरोपही केला जात असल्याने यावरून आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मते लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे. एमआयएम हि भाजपची बी टीम नाही तर ती झेंडाही होऊ शकत नाही. आमचे तीन शत्रू आहेत. पहिला काँग्रेस,दुसरा एमआयएम आणि तिसरा कम्युनिस्ट,” अशी टीका दानवे यांनी केली.

रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर माध्यमांशी संवाद साधताना टीका केली. यावेळी दानवे म्हणाले की, वास्तविक आम्ही मतांचे व जातीचे राजकारण कधीच करत नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनच केले जाते. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दलितांची मत जास्त लागतात. पण त्या मतदारांच्या जातीतील नेते, पक्ष चालत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणुकीच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मतं लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे.

वास्तविक खरी गोष्ट लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार उभा केला होता. तसेच शिवसेनेमध्ये आता दाखवण्यासाठीही हिंदुत्व राहिलं नाही. शिवसेनेचे हिंदुत्व ते फिके पडले आहे. वारंवार ते हिंदुत्वाचा उल्लेख करतायत, पण आता त्यांच्याकडे तसे काही राहिलेले नाही. तुम्ही हिंदुत्वाचे आहात तर जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना पाठींबा देतात. फिक्या पडलेल्या शिवसेनेला रंग देण्याचा शिवसेनेचा प्रकार आहे. पण भाजपवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे दानवे यांनी म्हंटले.

“… हि तर सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे”; एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे … Read more