Wednesday, June 7, 2023

राज ठाकरेंची अवस्था विजण्याआधी फडफणाऱ्या दिव्याप्रमाणे; राऊतांचा भाजपसह ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सगळे राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. दरम्यान त्यांनी मनसे हा विझलेला विझवणारा पक्ष आहे असे म्हंटले. यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे व भाजपवर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे भाजपचा भोंगा असून भाजपने ईडीच्या दिल्यामुळे हा भोंगा वाजतो आहे. आज राज ठाकरेंची अवस्था हि एखादा दिवा विझण्याआधी जसा फडफडतो त्या प्रमाणे झाली आहे,” अशी टीका करीत राऊतांनी हल्लाबोल केला.

काल मनसेच्या ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर एक प्रकारे हल्लबोलच केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरूनही त्यांनी टीकास्त्र सोडले. राऊतांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

राजकारणात अल्टिमेटम देण्याची ताकद हि फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. राज ठाकरे याची अवस्था हि आहे. आणि आज जो भोंगा वाजत आहे तो भाजपचाच आहे, असेही यावेळी राऊत यांनी म्हंटले.