गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

रत्नागिरी जिल्ह्यात सेना-भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर

रत्नागिरी प्रतिनिधी। राज्यात शिवसेना भाजपाची युती झाल्याचे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु भाजपाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी दापोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना – भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण ज्या मतदार संघातून शिवसेनेनं एबी फॉर्म भरून दिला आहे. त्याच मतदारसंघात भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत साठे यांच्या नावाने आपला … Read more

राहुल कुल रासप कडूनच विधानसभा निवडणूक लढणार

पुणे प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीत दौंड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले हॊते. सोबतच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते कुल हे भाजपच्याच तिकिटावर लढणार असल्याचा डंका वाजवत होते. अखेर या चर्चेला आता स्वतः राहुल कुल यांनीच पूर्णविराम दिला. ‘मी रासप कडूनच निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी … Read more

चांद्रयान २ तांत्रिक अडचणींमुळं अडलं, आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदावर पोहचतीलच – संजय राऊत

काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचू शकले नाही, मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या २१ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर जरूर पोहचतील – संजय राऊत

ठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई प्रतिनिधी। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रभावी असणाऱ्या ठाकरे घराण्यातुन निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंच नाव आता निश्चित झालं आहे. जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला केला आहे. सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची “हीच ती वेळ” असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक … Read more

पाथरी विधानसभा मतदार संघाचा इतिहास काय सांगतो..

परभणी प्रतिनिधी। ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. १९९० पासून मतदारसंघात सलग ३ वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार … Read more

ज्योतीताई पाटील यांच्या उमेदवारीबाबत संजयकाकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सांगली प्रतिनिधी| कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई यांना तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत आजपर्यंत खासदारांनी मौन पाळले होते. आता मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे खा.संजयकाका पाटील यांनी मतदार संघाची बदलती परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावर घातली असून उमेदवारीबाबत ते कार्यकर्त्यांची बैठक लवकरच घेणार असल्याचे वृत्त आहे. ज्योतीताई … Read more

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण … Read more