‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या घटना मतदानादिवशी उघडकीस आल्या आहेत. कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला राग सातारा जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्यावर काढला आहे. तुम्ही मोदी-शहांचं कंत्राट घेऊन काम करता का? अशा शब्दांत नागरिकांनी मोनिका सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. साताऱ्यातील नवलेवाडी येथे ‘ईव्हीएम’मध्ये घोळ झाल्याने नागरिक संतप्त झाले होते.

२०१९ च्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून खासदार झालेल्या उदयनराजे यांनी तीनच महिन्यांत आपल्या खासदरकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत त्यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सातारकर नागरिक चांगलेच नाराज असल्याचं चित्रही पहायला मिळालं होतं. “मतदार जर आपली नाराजी मतपेटीतून दाखवत असतील आणि ती मतपेटीच मॅनेज केली असेल तर मतदान घेताच कशाला ??” असा संतप्त सवाल कोरेगाव तालुक्यातील शिवथर येथील शिवराम ठावरे यांनी विचारला आहे. एवढ्या नाराजीनंतरही उदयनराजे निवडून आले तर त्यांच्या विरोधात मतदान केलेल्या सर्व मतदारांना रस्त्यावर उतरवून ईव्हीएमचा पर्दाफाश करू असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Leave a Comment