राज्य सरकारने मराठा तरुणांच्या पाठीत खुपसलेला खंजीर महागात पडेल- चंद्रकांत पाटील

मुंबई । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करुन मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे”, अशी घाणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर केली आहे. “राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे … Read more

आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; खासदार उदयनराजेंचा इशारा

सातारा। मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणी न्यायालयाने चार आठवडयांसाठी लांबणीवर टाकल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी टीकास्त्र सोडले आहे. काय म्हणाले उदयनराजे? मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित … Read more

मराठा आरक्षणप्रकरणी विनायक मेटेंनी केला राज्य सरकारवर ‘हा’ धक्कादायक आरोप

मुंबई । मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर धक्कादायक आरोप केला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडेच व्हावी असं राज्य सरकार बोलत असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने कोर्टात अर्ज सादर केलेलाच नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा … Read more

‘बोलघेवडेपणा सोडा! अन कृतीवर भर द्या!’ फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadanvis

हिंगोली । राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी … Read more

नवरात्रोत्सवात पीयूष गोयल यांची मोठी घोषणा, उद्यापासून महिला देखील ‘या’ गाड्यांमध्ये करू शकतील प्रवास

नवी दिल्ली । देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई मध्ये उद्या 21 ऑक्टोबरपासून महिला लोकल गाड्यांमध्ये प्रवास करू शकतील. खरं तर कोरोना संकटामुळे महिलांवर मुंबई लोकलमधून प्रवास करणार्‍या बंदी घालण्यात आली होती. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारतीय रेल्वेने महिलांना उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. महिला लोकल गाड्यांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 आणि … Read more

फडणवीसांची ड्रीम योजना चौकशीच्या फेऱ्यात; जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी

मुंबई । जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही ड्रीम योजना होती. मात्र या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानेच ही चौकशी … Read more

रेशीम उत्पादकांसाठी खुशखबर; राज्य सरकारने वितरित केला ६२. ७४ लाख रुपयांचा निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील रेशीम बीज  कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी पूंज निर्मितीसाठी  महाराष्ट्र सरकारकडून  ६२. ७४ लाख  रुपयांचा निधी  वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री  राजेंद्र पाटील यड्रावर यांनी  सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे … Read more

कृषी कायद्यांना राज्य सरकारचा विरोध; अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु

मुंबई । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रात विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार कृषी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे. शेतकरी विषयक कायदे … Read more

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा नाही तर परिणामांना सामोरे जा! उदयनराजे बरसले

सातारा । मराठी समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा इशाराच उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. … Read more

राज्य सरकारची मोठी घोषणा! वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द, यापुढे ‘वन स्टेट वन मेरिट’

मुंबई । राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. 70:30 कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून तसंच शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकार ही कोटा पद्धत रद्द करत असल्याचं अमित देशमुख म्हणाले. तसंच यापुढे ‘वन स्टेट वन मेरिट’ राहिल असंही देशमुख यांनी … Read more