आता कंपन्या दुधाच्या नावाखाली लोकांना फसवू शकणार नाहीत, FSSAI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने दुधाबाबतीतला मोठा नियम बदलला आहे. यामुळे लवकरच सोया दूध आणि बदाम दूध किंवा आईस्क्रीम (सोया दूध, बदाम दूध, आईस्क्रीम) विकणार्‍या बर्‍याच ब्रँडना दुध हा शब्द वापरणे थांबवावे लागेल. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने या मसुद्याची अधिसूचना जारी केली आहे. या मसुद्यानुसार दुग्धजन्य पदार्थ आणि वनस्पती-आधारित डेअरी उत्पादनांच्या … Read more

1 सप्टेंबरपासून सुरु होणार शाळा, मात्र 62% पालक अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांची वाढ सुरूच आहे. भारतात दररोज हजारो नवीन संक्रमण समोर येत आहेत. आतापर्यंत देशातील 23 लाखाहून अधिक लोकांना कोविड -१९ चा फटका बसला आहे. देशातील संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे ही दिलासा देणारी बाब आहे. लॉकडाउन शांत झाल्यानंतरही लोक अजूनही पूर्वीसारखे बाहेर पडण्यापासून दूर जात आहेत. … Read more

राज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर । माजी मंत्री व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. पण सरकारने जनतेचे लक्ष विचलित करून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे … Read more

मंदिरं उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कोरोना दिसतो; सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टात पर्यूषण काळात महाराष्ट्रातील जैन मंदिरं सुरु ठेवण्यासाठी याचिका करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं. महाराष्ट्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक गोष्टींना परवानगी देतं, मात्र मंदिरं उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोरोनाचं कारण पुढे करतं हे थोडं विचित्र आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. जिथे पैशांचा संबंध आहे … Read more

‘या’ कारणामुळं राज्य सरकार ई-पासची अट रद्द करण्याच्या विचारात

 मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक केला होता. दरम्यान, राज्य अनलॉक होत असताना राज्य सरकारने एसटी सेवा सुरू केली आहे. सोबतच एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, खाजगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास अजूनही बंधनकारक आहे. एसटीने प्रवास … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन बाप्पा सोबत मिळणार मास्क आणि सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास CBI कडे; न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय !- देवेंद्र फडणवीस

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संधान व्यक्त केलं आहे. आजचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल … Read more

1 लाख रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतेक वस्तूंची विक्री घसरली होती, परंतु यावेळी बिस्किटांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली. यावेळी सर्वच बिस्किट कंपन्यांची बिस्किटे विकली गेली. बिस्किटांच्या या विक्रमी विक्रीमुळे कंपन्यांची चांदी झाली. बिस्किट बनविणार्‍या कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली. याकाळातच बिस्किट निर्माता पार्लेने एक नवीन विक्रम नोंदविला होता. पार्ले-जी बिस्किटे इतकी विकली … Read more

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बदली घोटाळा करत पैसे गोळा केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई । महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप करतानाच या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. … Read more

यापुढे ट्रेनमध्ये भीक मागितल्यावर तसेच सिगारेट ओढल्यावर होणार नाही तुरूंगवास ! हा कायदा बदलण्याचा रेल्वेने दिला प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने आपला जुना कायदा बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने कॅबिनेट पुढे जो प्रस्ताव पाठविला आहे त्यात भारतीय रेल्वे अधिनियम 1989 चे दोन कायदे बदलण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. प्रस्तावानुसार, IRA च्या सेक्शन 144 (2) मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या … Read more