मुबंईत अडकून पडलेल्या आपल्या रयतेसाठी आमदार शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले..

सातारा प्रतिनीधी । कोरोनाच्या संकटामुळं राज्यभरात लॉकडाऊन लागू आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. अशा वेळी राज्यातील अनेक भागातून शहरात कामानिमित्ताने असलेले लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरात अडकून पडले आहेत. लॉकडाउनमुळे काम बंद आहे त्यामुळं राहण्याचे आणि जेवणाचे त्यांचे हाल होत आहेत. म्हणूनच मुंबईत अडकून असलेल्या सातारा व जावळी मतदार संघातील लोकांना त्याच्या मुळगावी परतण्याची परवानगी … Read more

१० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र … Read more

लॉकडाऊन हळूहळू शिथिल झालंच पाहिजे – सुप्रिया सुळे

मुंबई । कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू … Read more

बडे दिलवाला ‘खिलाडी’ कुमारकडून मुंबई पोलिसांना ‘इतक्या’ कोटींची मदत

मुंबई । कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. बऱ्याच सिने कलाकारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे तर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स दिलेत. अभिनेता अक्षय कुमारनं देखील लोकांच्या जीवासाठी रस्त्यावर दिवस रात्र पहारा देणाऱ्या मुंबई … Read more

कोटा येथील विद्यार्थ्यांची होणार ‘घरवापसी’; राज्य सरकार पाठवणार ९० एसटी बस

मुंबई । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊल उचललं आहे. कोटा येथे अडकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एकूण ९० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना … Read more

पंतप्रधान मोदींनी केलं राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले..

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला असल्याचं सांगत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचं … Read more

इतर वस्तूंच्या विक्रीचीही परवानगी द्या! Amazon-Flipkart ची केंद्राला विनंती

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला केंद्र सरकारची ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी आहे. Amazon-Flipkart या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सामानांची विक्री करत आहे. मात्र, ‘अनावश्यक असल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज असून अशा वस्तूंचीही विक्री करु द्यावी, अशी विनंती Amazon व Flipkart ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच सोशल … Read more

पुणे दहशतीत! एकाच रात्रीत आढळले ५५ कोरोनाग्रस्त

पुणे । काल रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात एकाएकी ५५ रुग्ण आढळल्याने पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर पोहोचली असून आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील कसबा, भवानी पेठ, येरवडा, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय परिसरात हे करोनाचे रुग्ण सापडले आहेत. पुणे शहर जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत ५५ रुग्णांची वाढ झाली … Read more

महाराष्ट्रासह इतर राज्यं लॉकडाउन वाढवण्याच्या तयारीत

मुंबई । येत्या ३ मे रोजी देशातील लॉकडाउनचा दुसरा टप्प्याचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यासाठी फक्त ६ दिवस बाकी आहे. अशात पुन्हा एकदा एका प्रश्नाने डोकं वर काढलं आहे तो प्रश्न म्हणजे लॉकडाऊन संपणार कि वाढणार? याअनुषंगाने, देशातील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील परिस्थितीचे मुल्यमापन केले असून लॉकडाउनचा कालावधी वाढण्याबाबात विचार करत आहे. आज, सोमवारी देशातील परिस्थितीचा … Read more

राज्यात ३ मेपर्यंत दुकानं बंदच राहणार – राजेश टोपे

मुंबई । कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. तसेच राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात असं या आदेशात म्हटलं गेलं होत. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया देत लॉकडाऊन संपेपर्यंत राज्यात कोणतीही … Read more