ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर!! टप्प्याटप्प्यानं घरी सोडण्याची राज्य सरकारने दर्शवली तयारी

बीड । लॉकडाऊनमुळे राज्यातील जवळपास 38 साखर कारखाने अंतर्गत तब्बल १ लाख 31 हजार 500 ऊसतोड कामगार विविध जिल्ह्यात अडकून पडले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अशा कामगारांना त्यांच्या घरी पोहचवावे, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांना टप्प्याटप्प्याने आपापल्या घरी सोडण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे … Read more

खबरदार लॉकडाऊनच्या काळात बायकोशी भांडाल तर… तुम्हाला होऊ शकते ही शिक्षा

पुणे । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहे. परिणामी लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळं महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास सुरुवातीला समुदेशन … Read more

लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील ऑटो रिक्षाचालक आर्थिक संकटात; जगावं की मरावं हाच प्रश्न..

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ऑटो रिक्षाचे हप्ते, घर खर्च, घराचे भाडे, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक अडचणीत सापडलेला ऑटो रिक्षाचालक आता लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊन वाढविल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील १९ हजार रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे काटकसरीने दिवस काढत आहेत. रिक्षाचालकांचा … Read more

कोल्हापूरात अवकाळी पावसाने ऊसतोड कामगारांच्या झोपड्या उद्ध्वस्त; रात्र पावसात भिजत काढली

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूमुळे सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनचा सर्वधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटांचा सामना हे ऊसतोड मजूर करत आहेत. रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे शिरोळ मधील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगारांच्या 100 हून अधिक झोपड्या उध्वस्त झाल्या … Read more

लॉकडाऊनमध्ये पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या

सांगली । राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्याला मनाई आहे. तेही केवळ लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा अनाठायी हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून नवरा माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

उद्याचं निर्णय जाहीर करा बस्स!! ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

मुंबई । लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत. इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर … Read more

मुंबई-पुणे वगळून इतर भागातील उद्योगांना लवकरच परवानगी; राज्य सरकारचे संकेत

मुंबई । कोरोनाच्या विषाणूचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागांत २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. उद्योग सुरू करण्यासाठी मात्र कामगारांच्या सुरक्षित वाहतुकीची-राहण्याची व्यवस्था करण्याची अट उद्योजकांवर टाकण्यात येणार आहे. या अटींमध्ये, जे उद्योजक आपल्या कामगारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, अशा उद्योजकांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. याचसोबत … Read more

गुड न्युज! लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार; ‘या’ वस्तू ऑर्डर करता येतील

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आपली सेवा बंद केली होती. मात्र, ग्राहकांसाठी एक गुड न्युज मिळत आहे. येत्या २० एप्रिल पासून ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं आता Amazon, Flipkart ई-कॉमर्स कंपन्यांना … Read more

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वयोमर्यादेत वाढ करण्याचे राज्य सरकारचे संकेत

मुंबई । दिवसागणिक देश आणि राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळं नियोजित एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळं या परीक्षा कधी होणार यावर कोणीही काही सांगू शकत नाही आहे. त्यामुळं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून उच्च व शिक्षण मंत्री … Read more

२० एप्रिल पासून उघडणार ऑनलाइन मार्केट; मोबाइल, TV सह या वस्तूंची खरेदी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत मोबाईल फोन, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्वच्छता संबंधित उत्पादनांच्या विक्रीस २० एप्रिलपासून परवानगी देण्यात येणार आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गृहसचिव अजय भाल्ला यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर एक दिवसानंतर गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. … Read more