हिंदू सणांवर निर्बंध लावण्याचे ठाकरे सरकारचे धोरण ; नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू सणांवर राज्य सरकारने निर्बंध लावले असल्याने यावरून आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे निवेदनदेत मागणीही केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “हिंदू सणांवर निर्बंध लावण्याचे ठाकरे सरकारचे धोरण आहे. हिंदू सणांचे महत्व कमी करण्याचे काम हे सरकार … Read more

कोण अमृता फडणवीस? ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला. “कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात … Read more

महाविकास आघाडी सरकार कुमकुवत; सरकार पडलं तर भाजपा चांगला पर्याय : अमृता फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकार पडण्याबाबत व युतीबाबत विधान केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुमकुवत असून, ते केव्हा पडेल हे काही सांगता येत नाही. जर हे सरकार पडले तर भाजपा … Read more

आरक्षण द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा; जबाबदारी झटकू नका; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे असे म्हंटले होते. यावरून भाजप विरोधी पक्षनेते … Read more

‘ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन’; राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्य सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात आता राज्य सरकारवर राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या 36 वसतिगृहाच्या मुद्यांवरून निशाणा साधला आहे. तर महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी समाजाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असल्याची टीका केली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर … Read more

राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? शेलार यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चीत असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अदानी यांच्या नावाने फलक लावण्यात आला होता. तो शिवसैनिकांनी तोडफोड करीत काढून टाकला. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? असा सवाल … Read more

आघाडी सरकार घोटाळेबाज “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते; आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून वारंवार हल्लाबोल केला जात आहे. धुळे येथे भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा शब्दात शेलार यांनी निशाणा साधला आहे. भाजपची धुळे या ठिकाणी संघटनात्मक बैठक आज पार पडली. यावेळी … Read more

त्यांच्या दौऱ्यामुळे तुमच्या पोटात दुखण्याचं काही कारणच नाही; दरेकरांचा मलिकांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद राज्यपालांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा पेटला आहे. यावरून काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला. त्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे. “महामहिम राज्यपाल महोदयांनी काही जिल्ह्यांचा दौरा करण्यात काय … Read more

“महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर…,” राऊतांचा राज्यपालांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी … Read more

हे तर आरक्षणावर पडदा टाकण्याचे कारस्थान; राम शिंदे यांचा आघाडी सरकारवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून आज कोल्हापुरात दौऱ्यावेळीही मुख्यमंत्री ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजीही झाली. त्यांनतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपवर आरोप केला आहे. “मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीचे निमित्त मिळाले आहे. मात्र, त्या आडून मराठा … Read more