सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्वाची बैठक

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० – २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या असून यासंदर्भातच सरकारची पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी साडे ६ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी … Read more

धक्कादायक! मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात, लातूरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लातूरमधील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी औषध पिऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. किशोर गिरीधर कदम असे या युवकाचे नाव आहे. या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी … Read more

‘महाभकास आघाडीला मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही’- चंद्रकांत पाटील

मुंबई । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने आज तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या असून महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरून घेरले आहे. मराठा समाजासाठी हा काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आजच्या निर्णयाचा महाराष्ट्रावर परिणाम झाला. भाजप सरकारने मराठा आरक्षण सर्व प्रक्रिया पार करत राज्यात … Read more

२०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश

नवी दिल्ली । सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. मात्र  प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही … Read more

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा ‘नवी तारीख’; २८ ऑगस्ट रोजी होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार असंच चित्र आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत दिसून आलं. आजच्या सुनावणीवेळी आरक्षणावर राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहोतगी, मध्यस्थांचे वकिल कपिल सिब्बल आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकिल नरसिंह यांनी जोरदार युक्तीवाद केला. दरम्यान, आज कोणताही निर्णय होऊ शकला नाही, याची पुढील सुनावणी २८ ऑगस्टपर्यंत पुढे … Read more

मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत केली ‘ही’ वाढ

मुंबई । एकीकडे अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवण्याची मागणी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे.मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातील इतर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे मिळाले आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची … Read more

विनायक मेटेंच्या ‘त्या’ मागणीवर काँगेस संतापली; केला जोरदार पलटवार

मुंबई । मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या मागणीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार पलटवार केलाय. सचिन सावंत यांनी ट्विटवर विनायक मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. सचिन स्वतः म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी यावेळी केली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच सुनावणीपर्यंत नोकर भरतीला स्थगिती दिली असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेतला आहे. मराठा … Read more

तर नंतर कुठलेही सरकार आलं तर २०-२५ वर्ष मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही – चंद्रकांत पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कराडच्या कृष्णा हॉस्पीटल कोरोना उपचारांची पाहणी करुन 15 कोरोनामुक्त रुग्णाचा सत्कार करून डिस्चार्ज दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना विनायक मेठेंनी मराठ्यांना दुजाभाव का असं पत्र लिहीलय…प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सुनावणी सुरू आहे…तरी मराठा आंदोलन करण्याचा प्रयत्न होतोय…यामागचं राजकारण काय…??? या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील … Read more

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास अंतरिम आदेश नाही; पुढील सुनावणी २७ जुलैला

नवी दिल्ली । मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठा समाज आणि राज्य सरकारला सध्या तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, २७ जुलैपासून मराठा आरक्षणवर नियमित सुनावणी केली जाणार आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. मराठा आरक्षण प्रकरणी … Read more