औरंगाबादचे सायकल ट्रॅक देशात ‘टॉप पंधरामध्ये’

Aurangabad cycle track

औरंगाबाद : राष्ट्रीय स्तरावरील सायकल फॉर चेंज यांच्या अनोख्या स्पर्धेत औरंगाबादने स्मार्ट सिटी मध्ये समावेश झालेल्या देशभरातील शहरांमधून पहिल्या पंधरामध्ये स्थान पटकावले आहे मुख्य म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई व इंदूर सारख्या बड्या शहरांना मागे टाकत औरंगाबाद शहर पुढे आले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनतर्फे सायकल फॉर चेंज चॅलेंजरचे आयोजन केले आहे. याअंतर्गत स्मार्ट सिटी … Read more

घराची भिंत कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी

Wall collaps

हिंगोली : औंढा नागनाथ येथील रहीम चौक परिसरामध्ये राहत असलेल्या इसाखोद्दीन जाहिरोद्दीन खतीब यांच्या घरावर शनिवारी दुपारी तीन वाजता शेजारच्या घराची भिंत कोसळली. यात इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब व त्यांची पत्नी आरेफाबी इसाखोद्दीन खतीब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तीन शेळ्यांवर भिंत कोसळून त्या जागीच ठार झाल्या त्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या मुलीचे … Read more

आजपासून सुरु होणार मराठवाड्यातील 132 आयटीआयचे वर्ग

ITI

औरंगाबाद : कोरोना महामारी मुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना एडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील 132 आयटीआय आज पासून सुरू होणार आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या विभागात येणारी राज्यातील शासकीय आणि खासगी अशा सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. … Read more

मराठवाड्यातील संतपीठाचा 1 सप्टेंबरला श्रीगणेशा

bAMU

औरंगाबाद | मागील 40 वर्षांपासून करण्यात आलेली संतपीठाची मागणी पूर्णत्वास आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संतपीठाचे पालकत्व स्वीकारले असून येत्या 1 सप्टेंबरपासून संतपीठाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी ग्वाही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. शुक्रवारी डॉ. प्रमोद येवले यांच्या कुलगुरु पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या … Read more

मराठवाड्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पहिले आरोग्य केंद्र औरंगाबादेत लवकरच होणार सुरू

helth center

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये पहिल्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी शहरात आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठपुरावा केला होता. मराठवाड्यात आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती. या आरोग्य सुविधासाठी मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना शस्त्रक्रिया, गंभीर आजारावर उपचारासाठी पुणे, नागपूर, मुंबईला जावे लागत होते. परंतु आता याप्रकरणी खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव … Read more

येत्या तीन ते चार दिवसांत मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल

Heavy Rain

औरंगाबाद | 15 जून पासून पावसाच्या सिझनला सुरुवात होते. परंतु यंदा जुलै महिना उजाडला तरीही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमान वाढत असल्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता घेतलेल्या पिकावर डबल पीक घेण्याची म्हणजेच दुबार पीक घेण्याची वेळ … Read more

युवकांना नोकरीचे आमिष दाखवून 5 ते 10 लाखांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हिंगोली | महाराष्ट्रामध्ये दहा तर उत्तर प्रदेशात नोकरीसाठी आरोपीने तरुणांकडून पाच लाख उकळणाऱ्याला हिंगोली पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींकडून आता हळूहळू माहिती समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना नोकरीला लावण्यासाठी ५ ते १० लाख रुपये, त्याचबरोबर उत्तर प्रदेशात ८० हजार ते ५ लाख रुपये उकळले जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यामध्ये … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

राज्यात 6 दिवस पाऊस बरसणार; जाणुन घ्या कुठे होणार मेघगर्जना

rains

पुणे | राज्यात पाच ते सहा दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मागील 24 तासात राज्यात महाबळेश्वर येथे 19.4 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 41.9 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. … Read more