जुलै मध्ये लॉन्च होणार सरकारची हि नवी स्कीम; लाखो रुपये कमावण्याची संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये पुन्हा आपले दार उघडणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाही. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सचा ट्रॅक ठेवतात.  ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखेच असतात. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ईटीएफ हे केवळ स्टॉक … Read more

प्रधानमंत्री वय वंदन योजनेचा विस्तार, जाणून घ्या गुंतवणूक आणि पेंशनचे नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान वय वंदना योजना किंवा पीएमव्हीव्हीवायची मुदत ही पुढील ३ वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पीएमव्हीव्हीवाय ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे … Read more

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात FIR दाखल; PM Care बाबत चुकिची माहिती दिल्याचा आरोप 

वृत्तसंस्था । कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय तणाव हे भारतासाठी काही नवीन नाहीत. हे दोन्ही पक्ष सतत एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. सोशल मीडियावर गेले अनेक दिवस कोरोना संक्रमणाच्या काळातही दोन्ही पक्षाचे एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पीएम केअर फंडाची सर्व माहिती ऑनलाईन शेअर करण्यास सांगितले होते. कर्नाटकातील शिमोगा येथील एका वकिलांनी या … Read more

शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला ७० वर्षांपासून तुम्ही भीक मागताय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली … Read more

जर तुम्हीच पंतप्रधान असता तर काय केले असते? राहुल गांधी म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्न आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले की,” जेव्हा मूल रडते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही, … Read more

पंतप्रधान जनधन योजनेचे अनेक फायदे; फ्रि मध्ये मिळतो इन्श्युरन्स मात्र करावे लागेल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना देशभरातील सर्व कुटुंबांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केली गेली आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला बँकेत खाते उघडण्याची संधी देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र, याची प्रत्यक्ष सुरूवात ही २८ ऑगस्ट २०१४ रोजी झाली होती. या योजनेअंतर्गत बँकेत … Read more

मुद्रा शिशू कर्जाच्या व्याजावर सरकार देतेय १५०० करोड रुपयांची मदत; जाणुन घ्या कसा मिळवायचा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी माहिती देताना सांगितले की, सरकार मुद्रा शिशु योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी व्याजदरामध्ये २% सूट देईल. २० लाख कोटींच्या स्वावलंबी भारत आर्थिक मदत पॅकेजच्या दुसर्‍या हप्त्याचा हा एक भाग होता आणि त्यामध्ये शेतकरी, स्थलांतरित कामगार तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेते यांचा समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांना सवलतीची कर्जे, … Read more

रामदेव बाबांच्या पतंजलीची ऑनलाईन ऑर्डर साईट; मिळणार फ्री होम डिलिव्हरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच लोकांना खादीसारख्या वस्तूंची खरेदी तसेच या वस्तूंना पाठिंबा देण्याविषयी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्याच्या सुमारे ४८ तासांच्या आतच बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद भारतात देशी उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी खास ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे, ज्यामध्ये केवळ स्वदेशी उत्पादनेच उपलब्ध केली जाणार आहेत. ही वेबसाइट सुरु केल्यानंतर, पतंजली … Read more

२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनावर शशी थरुर म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी तेच जुने शेर नव्या नावाने पुन्हा विकले असे,म्हंटले आहे . यासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने एक ग्राफिक शेअर … Read more