सोमवारपासून गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सुरू; असे नोंदवा नाव

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक, विद्यार्थी गेल्या मागील काही दिवसांपासून अडकले आहेत. अशा अडकून पडलेल्यांना लोकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आपल्या गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही. या सर्वांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली असून … Read more

खुशखबर! मुंबई, पुण्यात अडकून असलेल्यांची शासन करणार एसटीनं मोफत घरी पाठवणी

मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. राज्यात अंतर्गत प्रवासावर निर्बंध घालत जिल्हा बंदी करण्यात आली. अशा परिस्थितीत मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी, कामधंदा, शिक्षणासाठी आलेले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिक अडकून पडले. दरम्यान आता मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये अडकून असणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शासनाकडून … Read more

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी चालकाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या  

माण तालुक्यातील दहिवडी शहरात दहिवडी एसटी आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे काशीनाथ अनंतराव वसव यांनी आज पहाटे माण नदीपात्रा नजीक असणाऱ्या स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून या बस चालकाने आत्महत्या केल्याचा बस चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ऐन दिवाळीत एसटी कडून तब्बल १० टक्के तिकीट वाढ

दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही १० टक्के भाडेवाढ केली आहे. २४ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कायम राहिल. भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल.

नेत्र तपासणीत अपात्र ठरलेल्या एसटी चालकावर उपासमारीची पाळी

बुलढाणा प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातील काही चालकांनी वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून खोट रातांधळेपणाच प्रमाणपत्र घेऊन सुरक्षारक्षक पदी पर्यायी नेमणूक करून घेत महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन डॉक्टरांसह एसटी महामंडळाच्या चालकांविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या सर्व प्रकरणात एका खरोखर रातांधळेपणा असलेल्या चालकाला एसटी महामंडळाने इतर जागांवर सामावून न … Read more

पहिल्या इलेक्ट्रिक एसटी बसचे लोकार्पण

वृत्तसंस्था |इलेक्ट्रिकवर चालणारी पहिली एसटी बस मुंबईत दाखल झाली आहे. ‘शिवाई’ असं या बसचं नामकरण करण्यात आलं असून ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. विजेवर चालणाऱ्या या पर्यावरण पूरक बसमुळे एसटी महामंडळाच्या खर्चात बचत होणार आहे. विजेवर चालणाऱ्या या बसचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. इंधन दरवाढीमुळे होणारा … Read more

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ८,०२२ जागांसाठी मेगा भरती

mqdefault

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालक व वाहक पदांकरता मेगाभरती जाहीर केली आहे. सदरील भरती दोन भागांत होणार असून इच्छुक उमेदवारांकडू अर्ज मागवण्यात आले आहेत. पहील्या फेरित ४,४१६ पदे तर दुसर्‍या फेरीत ३,६०६ पदे भरली जाणार आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे – एकुण जागा – ३६०६ जागा पदाचे नाव – चालक तथा वाहक … Read more