आता पंतप्रधान मोदी आहेत तरी कुठे? ‘या’ मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांनी केंद्रावर सोडलं टीकास्त्र

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मूडीज या संस्थेने भारताच्या जीडीपी रँकिंगबाबत व्यक्त केलेल्या मताचा धागा पकडून आता मोदी कुठे आहेत?असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्वीट अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर झालेल्या … Read more

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

PM-KISAN योजनेतून ६ हजार रुपये मिळवण्यासाठी ‘इथे’ चेक करा यादी; नाव नसेल तर ‘असा’ करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरीब वर्ग आणि शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार ८ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम सरकारकडून शेतकर्‍यांच्या खात्यात ३ हप्त्यांमध्ये २०००-२००० रुपये करून बँक खात्यात ट्रान्सफर केली … Read more

शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आता तिसरं पत्र; म्हणाले..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकट काळात पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर आलेल्या संकटासंदर्भात मोदींचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे मागील ३ महिन्यांपासून देशातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले … Read more

जुलै मध्ये लॉन्च होणार सरकारची हि नवी स्कीम; लाखो रुपये कमावण्याची संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये पुन्हा आपले दार उघडणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाही. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सचा ट्रॅक ठेवतात.  ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखेच असतात. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ईटीएफ हे केवळ स्टॉक … Read more

नुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या … Read more

‘अम्फानग्रस्त’ पश्चिम बंगालसाठी मोदींनी जाहीर केलं १ हजार कोटींचं पॅकेज

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची  हॅलिकॉप्टरमध्ये बसून  हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटींचं आर्थिक मदत पॅकेज जाहीर केलं … Read more

पंतप्रधान मोदी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी पश्चिम बंगाल-ओडिशा दौऱ्यावर

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे बंगालचं झालेलं नुकसान पाहण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनकर कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले … Read more

प्रधानमंत्री वय वंदन योजनेचा विस्तार, जाणून घ्या गुंतवणूक आणि पेंशनचे नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान वय वंदना योजना किंवा पीएमव्हीव्हीवायची मुदत ही पुढील ३ वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पीएमव्हीव्हीवाय ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे … Read more

सोनिया गांधींविरोधात FIR दाखल; PM Care Fund वरून चुकीचे आरोप केल्याचा ठपका

बेंगळुरू । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकातील शिमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नावाच्या स्थानिक वकिलाने हा एफआयआर दाखल केला आहे. पंतप्रधान केअर फंडाशी संबंधित, तसेच इतर आरोपांविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ११ मे … Read more