बळीराजाला वाचावा! शरद पवारांनी केली मोदींकडे पत्रातून मागणी

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करणार एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लॉकडाउनचा आर्थिक फटका शेती क्षेत्राला सुद्धा बसला आहे. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज … Read more

शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला ७० वर्षांपासून तुम्ही भीक मागताय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली … Read more

जर तुम्हीच पंतप्रधान असता तर काय केले असते? राहुल गांधी म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्न आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले की,” जेव्हा मूल रडते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही, … Read more

मैत्रीत ट्रम्प यांनी केली मोदींसोबत दगाबाजी; सरकारच्या ‘त्या’ योजनेला केला विरोध

वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून काढता पाय घेणाऱ्या कंपन्यांना भारताकडे आकर्षित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोडा घातला आहे. ट्रम्प यांनी चीनमधून बाहेर पडून भारतामध्ये निर्मिती उद्योग स्थापन करु इच्छिणाऱ्या अ‍ॅपलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीला मोठ्या प्रमाणात कर लादण्यात येईल असा कडक इशारा दिला आहे. चीनमधून बाहेर पडून अमेरिकेव्यतिरिक्त इतर … Read more

पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी कोरोना साथीच्या जागतिक परिणाम या विषयावर पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास देवाणघेवाण केली. वैज्ञानिक … Read more

कोरोना संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार

नवी दिल्ली । देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली … Read more

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी लोकल ट्रेन सुरु करा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबई । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याच्या काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्याही ऐकल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली. … Read more

लॉकडाउन कायम ठेवा! परंतु..; उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

मुंबई । लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज्यात पोलिसांना विश्रांती देण्याची गरज असून केंद्रीय पोलीस दलाला राज्यात पाठवावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या १७ मेला संपत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

‘मी पंतप्रधान असतो तर IFSC केंद्र बिहार, उत्तर प्रदेशात नेलं असतं’; संजय राऊत असं का? म्हणाले

मुंबई । आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विषयावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी पंतप्रधान असतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातऐवजी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पश्चिम बंगालसारख्या राज्यात नेलं … Read more

viral video: नरेंद्र मोदींना भेटले आणखी एक ‘गुलाम नबी’, मिश्कील कोपरखळी मारत साधला संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधान मंत्री भारतीय जनौषधी परियोजना या उपक्रमाचा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी एका प्रसंगी नरेंद्र मोदी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. एका प्रसंगात गुलाम नबी नावाची व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधू लागली असता मी काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांना पुलवामामधील गुलाम नबी यांची ओळख नक्की … Read more