ठाकरे – पवार सरकारकडून महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण करण्याचे पाप – किरीट सोमय्या यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. सोमय्या यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. “सध्या ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांकडून आपल्या जावयांना खुश करण्याचे काम केले जात आहे. राज्यात सध्या सर्वत्र भ्रष्टाचार, घोटाळे केले जात आहे. मी महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहे. घोटाळेबाज ठाकरे … Read more

दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन केले, वानखेडे मुस्लिमच; मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. “समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. आजही मी वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केले. वानखेडेंनी नोकरीसाठी नाव बदलण्याचे काम केले आहे. या प्रकाराबाबत आपण सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार … Read more

चंद्रकांत पाटील आपली मर्यादा ठेवून बोला, अशी भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले जात आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असे म्हंटले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले असून चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे. … Read more

फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात; मलिकांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना भाजपचा पोपट अस म्हणल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांना राष्ट्रवादीचा पोपट अस म्हणत प्रत्युत्तर दिले, दरम्यान पोपटाचा धंदा माझा नाही असे म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर पलटवार केला आहे. पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्ठ्या … Read more

माझा सेक्स रॅकेट आणि ड्रग्जशी काहीही संबंध नाही; काशिफ खानने फेटाळले मलिकांचे आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ पार्टीतील दाढीवाला म्हणजे काशिफ खान असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काशिफ खान याने मालिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. माझं कुठल्याही सेक्स रॅकेट अथवा ड्रग्जच्या उद्योगाशी संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात खडाजंगी रंगली आहे. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर टिका करताना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?, असा चिमटा … Read more

मी कधी सोन्याची तस्करी केली नाही, भंगारवाला असल्याचा मला अभिमान- नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजप आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच होय मी भंगारवाला आहे आणि मला याचा अभिमान आहे, मी कधी चोरी केली नाही, किंवा बँकेचे पैसे लुटले नाहीत असे मलिक यांनी म्हंटल. मी भंगारवाला आहे. माझी 100 … Read more

इतरांना जेलमध्ये टाकणाऱ्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागणार; छगन भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोप साईलने केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी वानखेडे यांनी एनसीबी अधिकारी … Read more

लाडक्या आर्यनला बेल मिळाला, मलिक आणि राऊत जनतेच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेणार का?? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू होते. आता आर्यन खान ला कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राज्य सरकार वर टीका केली आहे. तसेच नवाब मलिक आणि संजय राऊत जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार … Read more

वानखेडेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र; नवाब मलिकांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर काल आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. तर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची चौकशी केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. समीर वानखेडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र … Read more