माझा सेक्स रॅकेट आणि ड्रग्जशी काहीही संबंध नाही; काशिफ खानने फेटाळले मलिकांचे आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रूझ पार्टीतील दाढीवाला म्हणजे काशिफ खान असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काशिफ खान याने मालिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. माझं कुठल्याही सेक्स रॅकेट अथवा ड्रग्जच्या उद्योगाशी संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

माझा सेक्स रॅकेट आणि ड्रग्जशी काहीही संबंध नाही. नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे. मला वाटतं की त्यांच्याकडे सर्व चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी साधी सिगारेटही ओढत नसल्याचं लोकांना माहितीये. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत, चुकीचे आहेत. ते असं का करत आहेत हेही मला माहिती नाही.

मलिक नेमकं काय म्हणाले-

क्रूझवर एक दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर आपल्या प्रेयसीसोबत नाचत होता, तो एनसीबीचे समीर वानखेडे यांचा मित्र असल्याचा दावा मलिकांनी केला होता. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही असा आरोप मलिक यांनी केला.