औरंगाबादकरांना दिलासा ! ‘त्या’ ओमिक्रॉनबाधित कुटुंबीयांचा अहवाल निगेटिव्ह 

Corona

  औरंगाबाद – दुबईला मित्रांसोबत गेलेला आणि कोरोनाबाधित झालेल्या सिडको एन-7 भागातील तरुणाच्या आई, वडील आणि पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. सिडको एन 7 परिसरातील 33 वर्षीय तरुण हा मित्रांसोबत दुबईला गेला होता. दुबई येथून 16 डिसेंबरला तो शहरात … Read more

ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतही निर्बंध लागू

औरंगाबाद – गेल्या आठवड्यात राज्यभरात कोविड 19 व ओमीक्रॉनची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासून शहर व जिल्ह्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात जिल्हाभरात सर्व सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी … Read more

जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट?? तज्ज्ञांचा इशारा

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून जगभर पसरलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतात देखील हातपाय पसरले असून आत्तापर्यंत देशात 400 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग रोखता येणार नसून देशात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात 249 नव्या कोरोना … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ओमायक्राॅनचा शिरकाव; परदेशातुन आलेले दोघे बाधित 

omicron

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून जगभर पसरलेल्या ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने देशातही हातपाय पसरले असून महाराष्ट्रात ओमीक्रोन ची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातच भर म्हणून आज औरंगाबाद येथील दोघाना ओमायक्राॅनची लागण झाली असून संबंधित रुग्ण हे इंग्लंड आणि दुबई वरून आल्याचे समजते. लग्नसमारंभासाठी लंडनहून एक कुटुंब मुंबईत दाखल झाले होते. यातील तरुणीला … Read more

सावधान ! औरंगाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव; दोघांना लागण

  औरंगाबाद – अखेर औरंगाबादेत ओमायक्राॅनचा शिरकाव झाला असून, दोन ओमायक्राॅनबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -1, उस्मानाबाद – 5 आणि आता औरंगाबादमध्ये – 2 असे एकूण 8 ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी ओमायक्राॅन बाधित आढळली होती. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी … Read more

राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितला फॉर्म्युला

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नव्या नियमावली जारी करत राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यानंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी लागणार असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी लॉकडाऊन आणि त्यामागील गणितच सांगितले. राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन … Read more

ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग दुप्पट, नागरिकांनी सतर्कता बाळगावी; राजेश टोपेंचं आवाहन

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग दुप्पट असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते राजेश टोपे म्हणाले, ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग … Read more

ओमिक्रोनचा धोका वाढला; केंद्र सरकार राज्यात आरोग्य पथक पाठवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानंतर केंद्र सरकारही देशातील ओमीक्रोन रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यात आरोग्य पथक पाठवणार आहे. यामध्ये महाराष्ट्रचा समावेश आहे . केंद्राचे आरोग्य पथकाच्या टीम या देशातील १० राज्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं … Read more

लॉकडाऊन लावण्याबाबतचा निर्णय राज्यांनी घ्यावा – डॉ. भारती पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. “ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनचा लावण्याचा निर्णय राज्यातली परिस्थिती पाहून राज्यांनी निर्णय घ्यावा, … Read more

राज्यात विरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; मनसे नेत्याची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत राज्यात जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. दिवाळीमध्ये … Read more