लॉकडाऊन लावण्याबाबतचा निर्णय राज्यांनी घ्यावा – डॉ. भारती पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. “ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टापेक्षा अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनचा लावण्याचा निर्णय राज्यातली परिस्थिती पाहून राज्यांनी निर्णय घ्यावा, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी म्हंटले आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुन्ह्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, देशासह अनेक राज्यात सध्या ओमिक्रॉन आणि कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. याच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्राला जी मदत लागेल ती मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल. केंद्राची पथके ओमिक्रोन आढळलेल्या त्या त्या राज्यात जाऊन माहिती घेत आहे. तसेच त्या ठिकाणची माहितीही देत आहे.

राज्यात वाढत असलेल्या ओमिक्रोन व कोरोनाबाबत नागरिकांनी राज्य सरकारने दिलेले नियम पाळावेत. राज्य सरकारच्यावतीनेही नागरिकांना तसे आवाहन करण्यात आलेले आहे. राज्य सरकारने घालून दिलेले नियम जर नागरिकांनी पाळले नाहीत तर आपणचं आपला धोका ओढवून घेऊ, असेही यावेळी डॉ. भारती पवार यांनी म्हंटले.