सावधान ! मराठवाड्यात ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण, लातूरनंतर आता ‘या’ जिल्ह्यात आढळले रुग्ण

उस्मानाबाद – लातूरनंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बावी (ता.उस्मानाबाद) येथे ओमिक्रॉन कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळून आले आहेत. शारजा येथून तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याची बुधवारी (ता.15) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्थानिक … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकाला दिलासा

Raina

औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव … Read more

मंदिरात नियम डावलून पूजा करणे भोवले, भाजपच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने कालपासून राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेत मंदिरे खुली केली. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली. मात्र, यासाठी मंदिर व जिल्हा प्रशासनाने ठराविक नियम घालून दिले होते. नवरात्रीच्या काळात मंदिरात पूजा-विधी करता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाने दिल्या असतानाही भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी … Read more

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील … Read more

जगाला ‘तालिबान’ पासून अन् महाराष्ट्राला ‘धनुष्यबाण’ पासून खरा धोका

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणे यांच्या कारवाई करण्यात आली. यावर भाजप नेते राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका असल्याचं ट्विट केले. नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी हातावर घडी, तोंडावर बोट अशी भुमिका घेतल्याचे … Read more

‘अटी, शर्थिंसह कामाची परवानगी द्या’! चिठ्ठी लिहून सलून दुकानदाराची आत्महत्या

suicide

उस्मानाबाद | कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ठाकरे सरकारनं विकेंड लॉक डाउन आणि कडक निर्बंध घातले आहेत. मात्र याचा परिणाम अनेक छोट्या व्यावसायिकांवर होत आहे. आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि पुन्हा आता कडक निर्बंधांमुळे दुकान बंद असल्याने उस्मानाबाद येथील एका सलून व्यवसायिकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मनोज झेंडे ( रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद)असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे … Read more

बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मचाऱ्याकडून विवाहितेवर बलात्कार; उस्मानाबाद येथील घटनेने खळबळ

Balrampur Rape Victim

उस्मानाबाद । राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे. जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याचा आरोप ताजा असतानाच आता उस्मानाबाद येथे एका विवाहित महिलेला बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मच्याने बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. सदर महिलेने आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिली असल्याचं समजत आहे. 15 दिवसापुर्वीच पारधी … Read more

कोरोना लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह ; उस्मानाबादेत खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं असून जनतेची चिंता मात्र वाढली आहे. देशात कोरोना लसीकरण चालू असून देखील रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच दरम्यान आता कोरोना लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर तब्बल 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Divegaonkar) … Read more

म्हणुन पित्याने ठेवले मुलाचे नाव राष्ट्रपती; दुसऱ्या अपत्याच नाव ‘पंतप्रधान’ ठेवणार

उस्मानाबाद प्रतिनिधी | अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या – वेगळ्या स्वरुपाचे असते.  उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे “राष्ट्रपती” असे नामकरण केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागात बाळांच्या … Read more