‘निवडणुकांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’; मोदी सरकारनंतर अण्णांचा विरोधकांवर निशाणा

अहमदनगर । शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशातील विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. (Anna Hazare Criticises Opposition Parties) ”दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय फायदा समोर ठेवून विरोधक रस्त्यावर आले आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी विविध राजकीय पक्षांची ही आंदोलने चुकीची आहेत,” अशा शब्दांत … Read more

‘जो बोले सो निहाल’ म्हणत शेतकरी आंदोलनात इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूनेही घेतली उडी; लंडनमधील मोर्चात झाला सामील

लंडन । भारतातील शेतकऱ्यांना आता देशाबाहेरुनही चांगला पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जो बोले सो निहाल’ म्हणत आता शेतकरी आंदोलनात इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूनेही आता उडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या क्रिकेटपटूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायदा बदलण्याची मागणी केली आहे. या क्रिकेटपटूचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. हा इंग्लंडचा माजी … Read more

शेतकरी आंदोलन: …तर पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी बोलतील!

मुंबई । केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनं दबावाखाली येण्याची गरज नाही. केवळ मनानं विचार करणं गरजेचं आहे. डोक्यानं नव्हे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. तसं आपण मानत असू तर शेतकऱ्यांचं ऐकायलाच हवं. आपण शेतकऱ्यांचं … Read more

शेतीतलं शिवसेनेला कळतं तरी काय? मोदी विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; निलेश राणेंचा घणाघात

Nilesh rane and uddhav thakarey

मुंबई । शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या … Read more

मोदी सरकारने संसदेची नवी इमारत बांधण्याचा घातला घाट; 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली । संसदेच्या सध्याच्या इमारतीला अद्याप शंभर वर्षेही पूर्ण झालेली नाहीत तोच मोदी सरकारने संसदेची नवी इमारत बांधण्याचा घाट घातला आहे. अयोध्येत राम मंदिरापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीच्या नव्या मंदिराचीही उभारणी सुरु होत आहे. याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबरला होणार आहे. या भूमीपूजनला विरोधी पक्षातील काही मंत्र्यांना देखील आमंत्रित … Read more

फक्त ४ खासदार निवडून आणणारा लोकनेता, मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणाल? पडळकरांचा टोमणा

सांगली । ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा … Read more

फक्त ‘एवढं’ करा! मी भाजपमध्ये जाण्यास तयार; बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

अहमदनगर । केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी … Read more

Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. एन बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची … Read more

‘पृथ्वीवर २ व्यक्तींना शोधणं अशक्य, पहिला मोदींचा क्लासमेट अन् दुसरा…; शॉटगन शत्रुघ्न सिन्हांचा पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली । काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिन्हा यांनी ट्विटरवरुन २ ट्विट केले आहेत, त्यात म्हटलंय की, पृथ्वीवर या २ व्यक्तींना शोधणं अशक्य आहे, एक तर मोदींचा क्लासमेट आणि दुसरा मोदींच्या हातून चहा घेतलेला ग्राहक अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.(Shatrugan Sinha) तसेच शत्रुघ्न सिन्हा यांनी … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही मागितली, परंतु..

मुंबई । मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा खासदार संभाजीराजे भोसले लावून धरला आहे. सरकार मराठा आरक्षण प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील आणि विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनीही सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काय पत्रव्यवहार झाला, भेटीची वेळ मागितली होती का? असा प्रश्न … Read more